पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्धात. 1000 ( अध्याय ३, ) by अश्वल, आर्तभाग जारत्कारव, भुज्यु लाह्यायाने, उषस्त चाक्रयण, कहोल कौषीतकेय, गार्गी वाचक्नवी, उद्दालक आरुणि, शाकल्य विदग्ध, याज्ञवल्क्य, व कुरु पाञ्चाल देशांतील अनेक विद्वान् ब्राह्मण, सार्वभौम वैदेह जनक राजा बहुदक्षिण (अश्वमेध ) यज्ञ उरकून दक्षिणा वाटीत होता, त्यासमयीं एकत्र जमले होते. त्यांमध्ये मोठा विद्वान् ब्रह्मवादी कोण आहे, हे जाणण्याकरितां एक सहस्त्र सुवर्णपदकांनी श्रृंगारलेल्या उत्तम गायी जो कोणी उत्तम ब्रह्मनिष्ठ असेल त्यास देईन अशी जनक राजानें प्रतिज्ञा केली, ती सर्वांनी ऐकली, तरी पुढे होऊन त्या गायी ग्रहण कराव्या, असे कोणाच्याहि मनांत येईना; हाणून याज्ञवल्क्य ऋषीने आपला शिष्या सामश्रवा (सामवेद शिकणारा) ह्यास त्या गायी घेऊन जाण्यास सांगितलें. याज्ञवल्क्य हा मोठा ब्रह्मवादी असावा असा सर्वोस विस्मय जाहला. त्याच्या विद्वत्तेची परीक्षा करावी, ह्मणून, अश्वलादिक आठ ऋषींनी त्यास वेदान्त विषयांतील मुख्य तत्वांविषयीं प्रश्न केले. त्यां सर्वांची याज्ञवल्क्यानें समाधानकारक उत्तरें देऊन आपलें श्रेष्ठत्व सिद्ध केलें. प्रश्न करणारांनी अत्यन्त बिकट प्रश्न केले, तरी याज्ञवल्क्य ऋषि महाविद्वान् असल्यामुळे, त्यानें खात्रीलायक उत्तरें दिली हा विषय ह्या बृहदारण्यकाच्या तिसया अध्यायांत आहे. बृहदारण्यक उपनिषदाचे कालमानाविषयीं वगैरे विचार प्रथमाध्यायाचे आरंभी करण्यांत आले आहेत.. ब्राह्मण १. अश्वल प्रश्नांतील मुख्य मुद्दे असे आहेत कीं, संसारांत पडलेल्या सर्व मनुष्यांस कर्मासक्ति उत्पन्न होत असल्यामुळें,, व संसार आणि तदन्तर्गत सर्व कर्मे अत्यन्त अशाश्वत असल्यामुळे तदासक्त आत्म्याला जन्मपरंपरेचें बन्धन पडतें. तो संसार आणि ती कर्मों मृत्युस्वरूप आहेत. त्यांतून मुक्ति कशी मिळणार? हा पहिला प्रश्न. त्या प्रश्नाला याज्ञवल्क्यानें उत्तर दिले की, यज्ञा-- सारखी नित्यकम करीत असतांना यजमानानें आपण होतृस्वरूप, अग्निस्वरूप, अथवा वाग्देवता- रूप आहों, अशी दृष्टि ठेविली असतां तो मुक्तच असतो, अतिमुक्त होतो. या उत्तरांत मुक्ति व अतिमुक्ति असे मुक्तीचे विभाग केले आहेत. मी यज्ञकर्म करणारा होता ऋत्विज आहे, अग्नि- साहाय्यानें यज्ञ करीत आहे, व वाणीचा योग्य उपयोग करीत आहे, वगैरे भावना ठेविली. असतां स्वर्गादिक लोकांप्रत यजमान जातो, ही साधारण मुक्ति होय; पण वाणी तोच होता, व अग्नि तीच वाग्देवता, आणि मी देवतारूप आहे अशी दृष्टि ठेविली असतां अत्यन्त मुक्ति, अथवा साक्षात् ब्रह्मप्राप्ति होऊन संसाराचा व कर्माचा मुळींच संबंध राहत नाहीं.. अश्वलानें दुसरा प्रश्न असा केला की, कालाची दोन स्वरूपे आहेत – ( १ ) अहोरात्र स्वरूपी काल आहे, त्याच्या योगें सर्व कर्मों व कर्मसाधनें क्षीयमाण होत असतात; व तो कालच: मृत्यु आहे. त्यांतून मुक्ति व अतिमुक्ति कशी होते ? याज्ञवल्क्यानें उत्तर दिले की, यज्ञकर्त्याने