पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ३ .. यावरून देवतेच सादृश्य व ऐश्वर्य (काम्यकर्मपक्षी प्राप्त होतें, तें न प्राप्त होतां पंचमहाभूतांमध्यें · मनुष्यांचा लय होतो. 'पंचभूतांप्रत खचीत जातो. ' पंचभूतांच्या 'पलीकडे जातो' असा पाठ कांही लोक घेतात, त्या लोकांची वेदाविषयी बुद्धि कोती असल्यामुळें (उपनिषदांचें रहस्य कळ- ण्या जोगी व्यापक नसल्यानें ) त्यांनी तसा पाठ घेण्यास हरकत नाहीं. मनूचा (एकंदर ) अध्याय ब्रह्मदेवापर्यंत कर्मफलें सांगणारा व त्याहून भिन्न आत्मज्ञान .सांगणाराही आहे, तो अर्थवादरूप नाहीं, आणि कर्मकाण्ड व उपनिषत्काण्ड हीं दोन्हीं सांगण्याचा त्यांत हेतु आहे, असें ह्मणूं नये; कां तर, अमुक कर्मों केली पाहिजेत अशी वेदाज्ञा आहे, ती न केली, किंवा अमुक कर्मे करूं नयेत असा शास्त्रीय निषेध असतो ती केली तर, झाडें, कुत्रीं, त्याप्रमाणेंच ओकून टाकलेलें अन्न खाणारी पिशाचें वगैरे ह्यांच्या योनीत जन्मास आल्याची उदाहरणें दिसतात; डुकरें, वगैरेंचा जन्म प्राप्त झाल्याची उदाहरणें दिसतात. विहित किंवा प्रतिषिद्ध जेवढी कर्मे आहेत त्याबद्दल श्रुतिस्मृतींमध्यें विधि व प्रतिषेध आहे- तच. त्याशिवाय विहित किंवा प्रतिषिद्ध कर्मे असतील अशी कल्पना करितां येणार नाहीं. जीं कर्मों न केली, किंवा (जी न करावीं तीं ) केली तर पिशाचें, कुत्रीं, डुकरें, झाडें, वगैरे योनी प्राप्त होतात, हे प्रत्यक्ष किंवा अनुमानप्रमाणानें सिद्ध आहे. हे नीच जन्म नैष्कर्म्याचें फल आहेत "असे कोणाला कबूल नाहीं. ह्मणून विहित कमैं न केल्यानें व प्रतिषिद्ध कर्मों केल्यानें कर्मविपा- कानें पिशाचें, पशु, स्थावर, वगैरे नीच जन्म प्राप्त होतात, त्याप्रमाणेंच उत्कृष्ट कर्म केलें असतां ब्रह्मादिक देवयानी कर्मविपाकानेंच प्राप्त होतात असे समजावें. वायुदेवानें आपली वपा सोलन काढली व मोठ्यानें रुदन केलें, असे मंत्र आहेत ते केवळ अर्थवादस्वरूप अलंकारिक आहेत (हें खरें ); पण सगळे विधिनिषेध अलंकारिक ( न घडणाऱ्या गोष्टींची वर्णनें ) आहेत, असें ह्मणतां येणार नाहीं. वायुदेवतेचे सदरचे मंत्र देखील अलंकारिक नव्हेत, खऱ्या अर्थाचे आहेत, असें घेऊं लागाल तर तसें कां होईना ! परंतु तसें ह्मटल्यानें आमचा न्याय बिघडत नाहीं, व आमचा पक्ष दषित होत नाहीं. ब्रह्मदेव, विश्वस्रष्टा वगैरे स्वरूपें काम्य कर्माची फलें आहेत, असे कोणी लागेल तर, तसें ह्मणणे शक्य नाही. त्या काम्य कर्मापासून देवासारखें ऐश्वर्य प्राप्त होतें असें वेदात ह्मटलें आहे. या कारणाकरितां सकाम नित्यकर्मे व सर्वमेध, अश्वमेध, वगैरे त्या कर्माचें फल ब्रह्मादिक देवपणा प्राप्त होणें असें ह्मटले पाहिजे. ज्या कांही विद्वानांच्या मतें नित्यकर्मं करण्यांत फलाशा मुळींच नाहीं, आत्मा संस्कृत व्हावा ह्मणून करण्यांत येतात; त्यांच्या दृष्टीचें ज्ञान उत्पन्न होणें हें नित्यकर्माचें फल आहे. 'हा देह ज्ञानयुक्त होतो,' असें स्मृतींत झटलें आहे. मोक्ष प्राप्त होण्याला नित्यकर्मों अगदी जवळचीं साधनें आहेत असें झटलें तर, आमच्या ह्मणण्याला बाध येत नाही. याविषयीं खुलासा सहावे 'अध्यायांत जनकाची गोष्ट संपविण्याचें वेळी आह्मीं सांगूं. आतां विषद्ह्याचे कांहीं परिणाम भिन्न प्रकारचे होतात, हें ह्मणणें प्रत्यक्ष व अनुमान प्रमाणावर अवलंबून आहे, ह्मणून विरुद्ध नाहीं. ज्या ठिकाणी केवळ शब्दप्रमाणानें एकादी गोष्ट सिद्ध करावयाची असते, त्या ठिकाणीं ती गोष्ट सिद्ध करणारें श्रुतिवाक्य नसेल तर, विषद्ह्याचें वगैरे उदाहरण घेऊन त्याशीं सादृश्य आहे अशी उगीच कल्पना करितां येणार नाहीं. .