पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १] भुज्युब्राह्मण–पारिक्षित मुक्ति सूर्याचा उजेड सर्वांस रूपविषय पाहण्यास साधनीभूत होतो, पण घुबडें वगैरे त्या उजे- डानें रूप पहात नाहीत, आणि इतर लोकांच्या डोळ्यांहून त्यांचे डोळे भिन्न आहेत, एवढ्या- वरून घुबडांच्या डोळ्यांना रस वगैरे विषय समजतात, अशी कल्पना कोणी करीत नाहीं; कां- तर रस वगैरे विषय ग्रहण करण्याचें सामर्थ्य डोळ्यांच्या अंगी असल्याचें पाहिलें नाहीं. याप्रमाणें (घुबडासारखें ) दूरचें उदाहरण घेतलें तरी ज्या विषयांवर इंद्रियांचें सामर्थ्य चालतें असें पाहिलें असेल, त्या विषयामध्येंच ( रूपविषय पाहण्यामध्येंच ) कांहीं भेद (कमीजास्तपणा ) कल्पावा. ( विषयांतर करूं नये. ) आतां मागें ह्मटलें कीं, विष, दहीं वगैरे पदार्थात, विद्या, मंत्र, शर्करा वगैरे पदार्थ मिश्रित केल्यानें फलांतर होते, ( त्याप्रमाणें नित्यकर्माच्या जोडीला विद्या वगैरे असली तर ) त्यांचें इतर कर्मफलांहून कांहीं भिन्न फल ( मोक्ष ) होतें; आणि असें विशिष्ट कार्य होऊं लागलें तर तें इष्ट असल्यामुळे विरुद्ध नाहीं. निष्काम कर्म विद्यासंयुक्त असल्यास त्यापासून भिन्न कार्य झालें तर कांहीं विरुद्ध नाहीं. देवांपासून फल मिळण्याकरितां होम करणारा व आत्मयाग करणारा या दोघांमध्यें निष्काम आत्मयाजी श्रेष्ठ असतो, अशा श्रुति आहेत. 'देवयाजीपेक्षा आत्मयाजी श्रेष्ठ' अशी श्रुति आहे; व ' विद्यासहित जें जें कर्म करितो ( तें तें श्रेष्ठ ) अशीही श्रुति आहे. परंतु जो परमात्मदर्शनाच्या संबंधानें मनूनें आत्मयाजी शब्द वापरला आहे, ( तो नित्यकर्म करणाराचा दर्शक नाहीं. ) समदृष्टि ठेवणारा आत्मयाजी, असें झटलें आहे, त्या स्थळीं आत्मयाग करणारा समदृष्टि असतो असा ( मनूंचा) अभिप्राय आहे. अथवा पूर्वी जी स्थिति प्राप्त झाली असेल, त्या स्थितीच्या संबंधानें (आत्मयाजी शब्द वापरला आहे, ) तो आप- ल्या शरीरावर संस्कार करण्याकरितां नित्यकर्मे करीत असतो. “ या कर्मानें हैं माझें अंग संस्कृत होतें, " अशी श्रुति आहे. अथवा गर्भसंबंधाचे होम ( केल्याने किंवा मौंजीबंधन वगैरे कर्मानी बीजदोष जातात, ) त्या प्रकरणांत क्रियासाहित्यरूप जी नित्यकर्माची अंगें तीं संस्कृत कर- ण्याकरितां नित्यकर्माची आवश्यकता आहे. याप्रमाणें जो आत्मयाजी संस्कृत होतो तो त्या ( नित्य ) कर्मोनी समदृष्टि ठेवण्यास योग्य होतो. त्यास इहजन्मीं किंवा जन्मांतरी समदृष्टि प्राप्त होते. समदर्शी झाला ह्मणजे स्वाराज्याचा अधिकारी होतो असा अभिप्राय आहे. ( यावरून ) आत्मयाजी शब्द पूर्वसिद्ध स्थितीला अनुलक्षून आहे. ज्ञानयुक्त नित्यकर्मे ज्ञानोत्पत्तीला साधनी- भूत होतात, असें श्रुतीवरून दिसतें. आणखी असें आहे कीं, “ब्रह्मदेव, विश्वसष्टा, धर्म, महान, आणि अव्यक्त यांचे पदाला प्राप्त होणें ही शेवटची सत्वगुणात्मक स्थिति मनीषीला (महात्म्याला) प्राप्त होतें, ” असें ह्मणतात. १ – ह्यावरून विशिष्ट नित्यकर्माचें विशिष्टफल ( मोक्ष ) आहे. २ – सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि । संपश्यन्नात्मयाजी वै स्वाराज्यमधिगच्छति ॥ अर्थ – सर्व भूतांचे ठायीं आत्मा पाइतो, व सर्व भूतें आत्म्याचे ठिकाणी पाहतो, ( आपण तींच सर्वभूतें व सर्वभूतें तींच आपण असें पाहतो ) याप्रमाणें उत्कृष्ट पाहणारा आत्मयाजी खचित स्वाराज्याप्रत पावतो.मनुस्मृति,