पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १ ] भुज्युब्राह्मण-पारिक्षित मुक्ति २९ इतर प्रमाणांनां विरुद्ध जी गोष्ट आहे ती केवळ श्रुतीनें सिद्ध करितां यावयाची नाही. अग्नि थंड असून आपणास भिजवितो असें श्रुतीनें झटलें, तर तें प्रमाण मानितां यावयाचें नाहीं. श्रुतिवाक्यांत वस्तुवर्णन असेल तर तेथे प्रमाणांतर खोटें पडते. काजवा अग्नि आहे, आकाश निळें आहे, असेंच मुलांना प्रत्यक्ष दिसतें; परंतु काजवा अग्नि नव्हे, आकाश निळें नव्हे, असें अन्य प्रमाणांनी आपलें मनांत ठसविलें, ह्मणजे मुलांस प्रत्यक्ष जी गोष्ट निश्चयात्मक वाटते ती खोटी ठरते. यारून वस्तुस्वरूप वर्णन करण्याचे कामी वेदांचें प्रामाण्य निरर्थक होत नसल्यामुळे वेद- वाक्य खरें होईल. मनुष्यांच्या बुद्धिकौशल्यानें वर्णिलेली गोष्ट खरी असत नाहीं. कोणी मोठ्या चातुर्यानें सूर्याचा प्रकाश मुळींच नाहीं असे सिद्ध करील तर सूर्य प्रकाशणार नाहीं असे होणार नाहीं. याप्रमाणेच वेदवाक्यांवर नवाच अर्थ स्थापित करता येणार नाहीं. तात्पर्य ( अर्थापत्तीनें, किंवा पारिशेष्यन्यायानें, किंवा विषदह्याच्या उदाहरणानें ) कर्मापासून मोक्षफल होत नाहीं, सिद्ध झालें. कर्मफलें संसारांत पाडणारी आहेत, हे दाखविण्यांत ह्या ब्राह्मणाचा आरंभ आहे. ऋगर्थप्रकाशकभाष्य- 'अथ' ह्मणजे जारत्कारव आर्तभाग स्तब्ध झाल्यावर, लह्याचा पुत्र लाह्य, त्याचा पुत्र लाह्यायनी, भुज्यु नांवांच्या ऋषीनें प्रश्न केला. याज्ञवल्क्या, अशी हाक मारून भाषण केलें. अश्वमेधविद्या प्रथम सांगितली. अश्वमेध यज्ञाचें फल समष्टिरूप आहे व व्यष्टिरूपही आहे. तो ज्ञानसहितकर्ममार्गानें केला, किंवा केवळ ज्ञानमार्गानेंच केला तर सर्व कर्मामध्यें उत्तम कोटी- चा आहे. भ्रूणहत्ये पलीकडे (गर्भहत्ये पलीकडे ) दुसरें महापाप किंवा अश्वमेधापलीकडे दुसरें महापुण्य नाहीं, असें स्मृति ह्मणतात; ह्मणून अश्वमेधानें समष्टिरूपाप्रत व व्यष्टिरूपाप्रत (अश्वमेध- याजी ) जातो. पैकी ब्रह्मांडाच्या पोटांत सर्वांस ठाऊक आहेत, अशा ज्या व्यष्टिरूप देवता आहेत, तद्रूपता अश्वमेध यागानें येते. “ ह्याचा ( सर्वफलरूप समष्टि देवतेचा) आत्मा आहे, " ( मृत्यु हा ) “ देवतां पैकी एक आहे, ” असे सांगितलें. आणि मृत्यु ह्मटला ह्मणजे क्षुधारूप, सूत्रात्मा, समष्टि, प्रथम उत्पन्न झालेला, प्राणवायु, सत्यरूप, हिरण्यगर्भ (ब्रह्मदेव) होय. तो सर्व द्वैतजगताचा आत्मा असून, त्यानें सर्व पदार्थ प्रकट केले आहेत. त्यानें जगाला एकपणा आला असून, तो सर्व भृतांचा अंतरात्मा ( अंतर्यामी ) लिंगस्वरूप, अमर्त ( जडदेहधारी नव्हे असा ) रसरूप आहे. सर्व भूतांची कर्मे त्याच्या आश्र- यानें राहतात. कर्माचें व कर्मसंबंधी सर्व विज्ञानांचें तो शेवटचें फल आहे, तोच सर्वांची शेवटची गति ( स्थान ) आहे. त्याला कोणते विषय ज्ञात आहेत, व सर्व ब्रह्मांडाला वेष्टून राहणारी त्याची व्याप्ति किती आहे, हे सांगितले पाहिजे. ती व्याप्ति सांगितली ह्मणजे बंध स्वरूप सर्व संसार सांगितल्यासारखा होईल. तो समष्टीचा व सर्व व्यष्टींचा आत्मा आहे; त्याचें दर्शन अलौकिक फल आहे, हे दाखविण्याकरितां ( लाह्यायनी भुज्यु ) आपल्यास घडून आलेली गोष्ट सांगतो. आणि ती गोष्ट ऐकवली ह्मणजे ( याज्ञवल्क्यासारख्या ) प्रतिवादीचे बुद्धीस व्यामोहांत घालीन अशी त्याची समजूत होती.