पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ३. प्रत्येक जीवाच्या इच्छा भिन्न भिन्न असल्यामुळे त्यांची फलें व त्यांची साधनें सहजी अनंत होणार, आणि ती असंख्य असल्याकारणानें, अमुकच होतील हें मनुष्यांनी जाणण्यासारखें नाहीं; याप्रमाणें साधनें व फलें अमुकच आहेत हे कळत नाहीं, तर (पशुपुत्रस्वर्गादि फलांच्या यादी - पैकीं नित्यकर्माकरतां ) मोक्षच शिलक राहतो, असे कसें ह्मणतां येईल ? कर्मफलांच्या जाती आहेत, त्यासंबंधानें पारिशेष्यन्याय येतो असें ह्मणाल. इच्छा, विषय, व साधनें अनंत आहेत, तरी सर्व कर्मफलांना फलजाति असणें सारखेंच लागूं आहे, पण मोक्ष कर्माचें फल नसल्यामुळे शिलक राहील, (त्याची योजना कोठें तरी केली पाहिजे); ह्मणून पारि- शेष्यन्यायानें तो ( नित्य कर्माचें फल अशी ) कल्पना करणे योग्य आहे. असें ह्मटलें तर, तें जुळत नाहीं. नित्यकर्माचें फल मोक्ष आहे, असा तुमचा पक्ष घेतला ह्मणजे तो इतर कर्माच्या फलाच्या जातीसारखें एका जातीचें फल आहे, असें ह्मणावें लागेल; आणि परिशेषन्याय लागूं होणार नाहीं, ह्मणून अन्यरीतीनें (श्रुत्यज्ञेचें फल ) दाखवितां येत असल्यामुळे, (मोक्षाशिवाय नित्यकर्माचें दुसरें कांही तरी फल असेल इकडे ) अर्थापत्तिप्रमाणाचा विनियोग झाला. नित्य- कर्माचें फल उत्पत्ति, आप्ति, विकार, संस्कार यांपैकी एकादें असले पाहिजे, व तसें अनुमान करण्याकडे अर्थापत्ति खर्च झाली. चाही कर्मपरिणामांपैकींच मोक्ष एक परिणाम आहे, असें घ्यावें तर तो उत्पाद्य विषय नाहीं; (उत्पत्तिरूप परिणाम नव्हे); कां तर नित्य आहे. आणि नित्य असल्यामुळे तो विकृतिरूप परिणाम नव्हे; ह्याच कारणाकरितां संस्कार परिणामरूप नव्हे. साधन द्रव्यांना संस्काराची अपेक्षा असते; त्या द्रव्यांपैकीं मोक्ष नव्हे. साधनाला संस्कार करितात. तुपाच्या भांड्यावर प्रोक्षण वगैरे करून तें शुद्ध करितात. यज्ञस्तंभाला (तासून अष्टपैलू करून तेल लावून) संस्कार करितात. तसे संस्कार कांहींच मोक्षाला करावयाचे नसतात; व तो संस्कारांनी उत्पन्न होणारा नव्हे. (मोक्षप्राप्ति होते असें ह्मणतात ); परिशेष्यन्यायानें प्राप्तिरूप परिणाम मोक्ष आहे, असें ह्मणावें तर तो प्राप्य असें नाहीं. मोक्ष हा आत्म्याचा स्वभाव आहे. ( व एकाला दुसरें प्राप्त व्हावयाचें अशा दृष्टीनें आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो, असें ह्मणावें तर), आत्मा एक आहे. आतां नित्यकर्मों इतर कर्माहून भिन्न स्वरूपांची असल्यामुळे त्यांचें फल भिन्न असलें पाहिजे, असें ह्मणाल तर नाहीं. नित्यकर्में इतर कर्मीशीं कर्मपणानें सदृश आहेत तर, नित्यक- र्माचें फल इतर कर्माच्या फलांशीं सदृश कां असूं नये ? इतर कर्माहून निमित्त ( हेतु ) भिन्न असल्यामुळे नित्यकर्माची फलें ही भिन्न असली पाहिजेत असें ह्मणाल तर, नाहीं, कारण क्षाम- वती आदिकरून इष्टीसारखी आहेत-( त्या इष्टी अपघाताचे प्रायश्चित्ताकरितां असतात त्यामुळें नित्यकर्ममध्यें व त्यांमध्यें निमित्तभेद आहे, तरी सादृश्य असतें;) तें असें कीं, घराला आग लागल्याचे वगैरे निमित्तांमुळे क्षामवती आदिकरून इष्टी करितात. ( भिंतीला ) तडे गेले तर, किंवा (घर) पडलें तर, होम करावा अशीं नैमित्तिक कर्मे आहेत, पण त्यांचें फल मोक्ष कल्पीत नाहीत. त्यांशीं नित्यकर्माचें साम्य आहे; कारण (ज्यास्त दिवस ) जगण्याचें वगैरे निमित्त असलें ह्मणजे नित्यकर्मे नैमित्तिकांप्रमाणेच सांगण्यांत येतात, ह्यांवरून नित्यकर्माचें फल मोक्ष नव्हे.