पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. २-१०] आर्तभागब्राह्मण-ग्रहातिग्रहमुक्ति. भाष्य - वाणीच ग्रह; कारण, शारीरिक मर्यादेनें मर्यादित ( शध्दादि ) विषयासक्तीच्या कारणानें उप्तन्न झालेल्या असत्य, अनृतं, असभ्य, बीभत्स वगैरे भाषणांत गुंतलेल्या वाणी लोक मोहित झालेले असतात; त्यामुळे वाणी हा एक ग्रह ( म्हणजे बंधन आहे ). ती वाणी नामातिग्रहानें बांधली जाते. तो वाणनामक ग्रह वक्तव्यविषयरूप नामातिग्रहानें धरलेला आहे. मुळांत 'अतिग्राह ' असा शब्द आहे. त्यांतील दीर्घ अकार खचित आर्ष आहे. जें बोलाव याचे त्याच्याकरितां ह्मणून वाणी त्या वक्तव्यविषयानें प्रेरित झाली ह्मणजे त्याच्या स्वाधीन असते; त्यामुळे तें काम केल्याशिवाय तिची सुटका ( मुक्ति ) नाही. याकरितां वाणी नाम- रूपी अतिग्रहानें बद्ध आहे, असें म्हटलें. वक्तव्यविषयावरील आसक्तीनें वाणी प्रवृत्त झाली म्हणजे सर्व प्रकारचे अनर्थात पडते. बाकी ऋचांचा अर्थ सारखाच. ह्याप्रमाणें ( प्राण, वाक् वगैरे ) त्वचेपर्यंत आठ ( इंद्रियें ) ग्रह होत, व त्यांचे (गंधादिक ) स्पर्शापर्यंत आठ विषय, आठ अतिग्रह होत. असें ३, ४, ५, ६, ७, ८, ९ या ऋचांमध्यें वर्णन आहे. ऋचा १० – याज्ञवल्क्या, अशी हाक मारून ( आर्तभागाने पुढील ) प्रश्न केला. जर हैं सर्व मृत्यूचें अन्न आहे; तर ज्या देवतेचें मृत्यु अन्न आहे, ती देवता कोण ? अग्नि हा मृत्यूच आहे पण तो उदकाचें अन्न आहे. (पुरुषच ) पण मृत्यूला जिंकतो. भाष्य – ग्रह व अतिग्रह संपवल्यावर (श्रुति ) पुन्हां ह्मणते—' याज्ञवल्क्या अशी हाक मारून (आर्तभाग ) बोलला, ' - जें हें सर्व मृत्यूचें अन्न (ह्मणजे ) जें हें सकल प्रकट केलेलें ( वस्तुजात) मृत्यूला अन्नरूप आहे, तें सगळें उत्पन्न होतें व महातिग्रहरूप मृत्यूनें गिळलें ह्मणजे नाश पावतें. ज्या देवतेचें मृत्यु देखील अन्न होईल, ती देवता कोणती असावी ? कां तर अन्य श्रुतीत ह्मटलें आहे. " मृत्यु ज्याची शाक भाजी" आहे. 66 ( प्रश्न करणाऱ्याचा ) अभिप्राय असा - ( उत्तर देणारा जर) मृत्यूचाही मृत्यु सांगेल, तर अनवस्था होईलँ; आणि (मृत्यूचा मृत्यु) न सांगेल तर, ग्रहातिग्रहरूप मृत्यूपासून मोक्ष संभवत नाहीं. ग्रहातिग्रहरूप मृत्यूचा नाश होईल तरच मोक्ष होईल; (आणि ) असा तो मृत्यूचाही मृत्यु असेल तर ग्रहातिग्रहरूप मृत्यूचा नाश होईल. या कारणाकरितां (आपला ) प्रश्न निरुत्तर आहे असे मानणारा (आर्तभाग) प्रश्न करतो की, 'ती देवता कोणती' (वगैरे ). १ -- ज्या खोट्या वचनापासून परपीडा होते तें असत्य. २-~स्वतः पाहिलेल्या गोष्टीविषयीं विरुद्ध वर्णन करणें तें अमृत. ३ -- थोरवीस अयोग्य तें असभ्य. ४ -- ग्राम्य अगर घाणेरडें भाषण तें बीभत्स, ५ – वगैरे शब्दानें इष्ट अनिष्ट भाषण घ्यावें. ६--“ मृत्युर्यस्योपसेचनम् ' कटवल्ली २, ऋचा २५. ७--दांताचा दांत, डोळ्याचा डोळा वगैरे हाटलें तर शेवट कधींच होत नाहीं, ह्मणून तसें ह्मणणे अप्रयोजक होईल. ह्या अपवादाला अनवस्था ह्मणतात. ८ – मृत्यूचा मृत्यु आहे असे झटले तर अनवस्था होईल, नाहीं हाटलें तर मोक्षाचा अभाव ह्मणावा लागेल. ह्मणून प्रश्न निरुत्तर आहे असा आर्तभागाचा आशय आहे. २