पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३. ब्रा. २. मृत्यूचा मृत्यु आहे यात शंका नाहीं. (मृत्यूच्या मृत्यूचा ) आणखी दुसरा मृत्यु अशी अन- अवस्था होईल अशी शंका येते; ( पण या बाबतींत ) अनवस्था नाहीं. सकल वस्तूंचा विनाश करणारा जो मृत्यु असेल त्यास दुसरा मृत्यु असण्याचा संभव नाहीं. मग वर्णिलेल्या मृत्यूचा मृत्यु आहे हे कशावरून समजावयाचें ? ( प्रहातिप्रहाप्रमाणें विनाशक वस्तूंचा दुसरा विनाशक असतो हैं आपण ) पाहिलेले आहे. उदाहरण, सर्व (विदाह्य) वस्तूंचा अनि मृत्यु आहे, हें पाहिलेले आहे; कारण, अग्नि नाश करितो. त्याला उदक खातें, (ह्यावरून) तो अग्नि उदकाचें अन्न आहे. तर मग असें समज की मृत्यूचाही मृत्यु आहे; आणि तो मृत्यूचा मृत्यु सर्व ग्रहातिग्रह खातो. ( ग्रहातिग्रहरूप ) बंधन या मृत्यूनें खाल्लें ह्मणजे संसारापासून मोक्ष होणें हें युक्त होतें. ग्रहातिग्रहरूप बंधन आहे असें (पूर्वी) सांगितलें; आणि त्यापासून मोक्ष होणें योग्य आहे, हे सिद्ध झालें. यां ( सर्व कारणां) वरून बंधापासून मोक्ष होण्याकरितां पुरुष प्रयत्न करितो, तो (निष्फल होत नाहीं,) सफल होतो; त्यामुळे तो मृत्यूला (ही) जिंकितो. याज्ञवल्क्या, अशी हाक मारून (आर्तभाग) बोलला. जेव्हां हा ऋचा ११ . पुरुष मरतो तेव्हां प्राण त्यांतून उठून जातात की नाहीं? याज्ञवल्क्य ह्मणाला, नाहीं; नाहीं. ( ते प्राण ) यांतच लीन होतात. तो फुगतो, त्यांत वारा भरतो, आणि वायानें फुगलेला मरून (निचेष्ट) पडतो. भाष्य- - ( परमात्मदर्शनरूप ) मोठ्या मृत्यूनें ( ऐहिक ) मृत्यु खाल्ला ह्मणजे तो विद्वान् मुक्त पुरुष ज्या समयाला मरतो, ( त्या समयीं ) त्या मरणाऱ्या ब्रह्मवेत्त्यांतून प्राण ह्मणजे वाचा आदिकरून ग्रह, (व ) नाम आदिकरून अतिग्रह त्यामध्यें वासनारूपानें अंतस्थ (आंत राह- णारे, देहांतराला ) कारणीभूत होणारे, बाहेर निघून जातात की नाही? नाहीं, असें याज्ञवल्क्य म्हणाला. ( ते प्राण ) बाहेर निघून जात नाहींत. तेथेंच ह्मणजे त्या पुरुषांतच परमात्म्याशी संगत होतात. विद्वानांची शरीरें (कार्यै ) आणि इंद्रियें (करणें ) परब्रह्मरूप उप्तत्तिस्थानामध्यें लीन होतात; ह्मणजे एकरूप होऊन संसृष्ट होतात; उदाहरण, सागरामध्यें लाटा एकरूप हाऊन समुद्रांत मिळतात. याप्रमाणेंच अन्य श्रुति कलासंज्ञक प्राणांचा पर याचे ठायीं लय दाखविते. “याप्रमाणेंच पूर्ण दर्शन झालेल्या ( पुरुषाच्या ) ह्या सोळा कला पुरुषांत रहाणाऱ्या, त्या (परम ) पुरुषाप्रत जाऊन अस्ताला जातातं. " याप्रमाणें प्राण परमात्म्याशी संयुक्त होतात असें दाखविलें आहे; तर (मग ) तो मेला नाहीं ? होय, तो मेला नाहीच; कारण तो फुगतो, त्यांत उलटा बाहेरचा वारा भरतो. भात्यात वारा शिरला ह्मणजे भाता फुगतो त्याप्रमाणें, तो फुगून निचेष्ट पडतो. ( मेला असें लोक मात्र ह्मणतात.) बंधननाश होऊन मुक्त झालेल्या पुरुषास कोठेंही जावें लागत नाही, असा या(श्रुति ) वाक्याचा अर्थ आहे. १—बाहेर जातात असें ह्मणावें तर 'ध्रुवं जन्म मृतस्य च. ' मरणाराला पुन्हा जन्म आहेच या न्यायानें पुनर्जन्म येणार. प्राण बाहेर जात नाहींत हा पक्ष घेतला असतां जीवन्मुक्त देखील मरतात, असें लोकांत दिसतें तें खोटें ठरेल. पण हा दुसरा पक्ष याज्ञवल्क्यानें खोडून काढला आहे. २- विषयसहित अकरा इंद्रियें (पंचज्ञानेंद्रियें, पंचकर्मेंद्रियें, व अंत:करण ), व पंचप्राण मिळून पुरुषाच्या सोळा कला आहेत. त्या पुरुषांतच राहतात. पहा " एवमेवास्य परिद्रष्टुरिमाः षोडशकलाः पुरुषायणाः पुरुषंप्राप्यास्तंगच्छन्ति " प्रश्न ६-५.