पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. बा. २. ★ विचारतात तो असा की, येथें (जमलेल्या मंडळींत) कठे कोणते आहेत, कालाप कोणते आहेत? प्रकृत गोष्टींत प्रह किंवा अतिग्रह नांवाचे कांही पदार्थ लोकप्रसिद्ध आहेत, असें नव्हतें. तसें असतें तर विशेष मजकुराचा प्रश्न योग्य झाला असता. आणखी अतिमुक्त होतो असें ह्मटलें. ग्रहांत सांप- डला असेल त्याचा मोक्ष तोच मुक्ति, व तीच अतिमुक्ति असें द्विवार कां झटलें ? अशी शंका ये- ईल. त्यावरून बंधनें (ग्रह) व अतिबंधनें (अतिग्रह) आली. पण त्यांतही वाणी, चक्षु, प्राण व मन हे चार ग्रह व अतिग्रह ठाऊकच आहेत, तर किती हा प्रश्न योग्य होत नाही, कारण ते प्रसिद्ध आहेत. असे नव्हें. अनिश्चय असल्यामुळे प्रश्न केलेला आहे. चार आहेत असे सांगण्याची इच्छा नव्हती, परंतु ह्या स्थळीं महातिप्रहांचा विचार करतांना ते आठ आहेत असें सांगावयाचें होतें. ह्मणून किती हा प्रश्न योग्यच आहे. आणि याच कारणाकरितां तोच मुक्ति, तीच अतिमुक्ति असें द्विवार ह्मटलें. ग्रह व अतिग्रह ( ही दोन्हीं) असल्याचें सिद्ध झालें. ह्मणून प्रहांची संख्या किती व अतिग्रहांची संख्या किती असा प्रश्न आर्तभाग करतो. दुसऱ्यानें ( याज्ञवल्क्यानें ) उत्तर दिलें— ग्रह आठ, व अतिग्रह आठ आहेत. आतां जे ते आठ ग्रह सांगितलें, ते कोणते निश्चयानें घ्यावे ? असें (शेवटी विचारलें.) ऋचा २- -माण ( घ्राणवायु ) हा एक ग्रह (बंधन) आहे. हा घ्राण अपान ( वायुगत गंधरूपी ) अतिग्रहानें धरलेला आहे. अपान वायूच्या साह्यानें वास घेतो. भाष्य -- ह्यावर (ग्रहातिग्रहांच्या संबंधानें याज्ञवल्क्य) म्हणतो प्राणच ग्रह. प्राण शब्दानें घाणाचा निर्देश केला आहे; कारण ( हैं ) प्रकरण ( इंद्रियांविषयीं आहे. ) तें ( घ्राण ) वायु- सहित असतें. अपानानें ह्मणजे गंधानें असें ( समजावें); गंध वाहण्याला अपानवायूचें साह्य लागतें, म्हणून गंधाला अपान म्हणतात. अपानवायूबरोबर गंध येतो, तो सर्व लोक नाकानें ( घ्राणानें ) घेतात. त्यावरून (मुळांत ) म्हटले आहे-अपानानें वास घेतो. ऋचा ३ – वाणीच ग्रह. हा नामानें ( वक्तव्यविषयरूप ) अतिग्रहानें बद्ध होतो; वाणीनेंच नामें उच्चारितो. - ऋचा ४ - जिव्हाच ग्रह. ती रसरूप अतिग्रहानें बद्ध आहे; जिव्हेनेंच रस जाणतो. ऋचा ५ – चक्षु ( डोळा ) च ग्रह. तो रूपविषयक अतिग्रहानें बद्ध आहे. डोळ्या- नेंच रूपें पाहतो. ऋचा ६ – कान (श्रोत्र) च ग्रह. तो शब्दरूप अतिग्रहानें बद्ध असून कानानेंच शब्द ऐकतो. ऋचा ७ – मनच ग्रह. तें इच्छारूप अतिग्रहानें बद्ध होतें; मनानेंच इच्छा करतो. ऋचा ८ - दोन हातच ग्रह. ते कर्मरूप अतिग्रहानें बद्ध होतात; हातांनीं कर्म करितो. ऋचा ९-त्वचाच ग्रह. ती स्पर्शरूपी अतिग्रहानें बद्ध झाल्यामुळे स्पर्श ओळखितो. ह्याप्रमाणे आठ ग्रह व आठ अतिग्रह आहेत. १ प्राचीनकाळी कठ ब्राह्मण, कालाप ब्राह्मण अशा ब्राह्मणाच्या शाखा असत.