पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १] आर्तभागब्राह्मण प्रहात्तिप्रहमुक्ति. १५ स्मृति ) प्रमाणही नाहीं. पाण्याचे पाट ( निरनिराळ्या कामाकरितां ) बांधून आणणें, ( किंवा ) प्रकाशाप्रमाणे, एका ( कर्मविधायक श्रुतिवाक्यानेंच संसार व ब्रह्म हीं ) दोन्हीं दाखविली जातात, असें म्हणाल तर, तें वाक्याचें लक्षणावरून सिद्ध होणार नाहीं. एके वाक्यांतील अर्थ प्रवृत्ति व निवृत्ति ह्या दोन्हींला साधक होईल असे समजणें शक्य नाहीं. पाण्याचा पाट आणणें किंवा प्रकाश ( ह्यांपासून भिन्नभिन्न कामे होतात किंवा पदार्थ दृष्टीस पडतात ) ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट असल्यामुळे त्यांत (एकापेक्षां अधिक प्रयोजनें असतात असे म्हणण्यास दोष नाहीं. ( दोन्ही गोष्टी प्रवृत्ति व निवृत्ति एक ठिकाणींच आहेत; ज्ञानाची व कर्माची सांगड आहे ) ह्या अर्थाचे मंत्र आढळतात, असें जरी म्हटलें तरी, हाच त्यांचा अर्थ हैं प्रमाणानें सिद्ध होणारें नव्हे. शिवाय मंत्र, या किंवा अन्यार्थी आहेत ? याविषयी विचारच पडेल. करितां ग्रहातिग्रहरूप मृत्युबंधन (अज्ञजनांस ) आहे त्यांतून मोक्ष कसा प्राप्त करून घ्यावा हें सांगणें अवश्य आहे; त्याकरितां पुढील ग्रंथाचा आरंभ आहे. दोन (प्रवृत्ति व निवृत्ति ) प्रकरणांच्या मध्यभागीं राहून अर्धी ह्यातारी (असें ह्मणण्यांत जें) चातुर्थ (लोक दाखवित असतात) तें आह्मांस येत नाहीं. मृत्यूपासून अतिमुक्ति होते असें सांगून, ग्रह व अतिग्रह ( या ब्राह्मणांत ) सांगितलें ते अर्थसंबंधानें आले. हा सर्व साध्य साधनरूप बंध आहे; कां तर ग्रह आणि अतिग्रह यांतून (कोणी) सुटलेला नाहीं. बेड्या कोणत्या आहेत हे कळल्यावर बद्धानें बेडीतून सुटण्याकरितां यत्न करावयाचा असतो. ह्मणन त्याकरितां ( बेड्या सांगण्याच्या हेतूनें) पुढील ग्रंथाचा आरंभ आहे. ‘ मग त्याला ’ ( या पुढे मुळांत ) "ह" हें अव्यय आहे, ह्याचा हेतु इतिहास ( सुचवि. ण्याचा आहे ). मग अश्वल थांबल्यावर सदरचा याज्ञवल्क्य (तेथें होता) त्याला जरत्कारू गोत्रां- तला जारत्कारव-ऋतभागाचा मुलगा आर्तभाग-ह्यानें प्रश्न केला. याज्ञवल्क्यानें आपणाकडे पहावें ह्मणून याज्ञवल्क्या, अशी हाक मारली, व प्रश्न पूर्वीच्या रीतीनेंच केला. ग्रह किती, व अतिग्रह किती ? (प्रश्नाचें शेवटीं ) ' इति' शब्द आहे तो प्रश्न- वाक्य पूर्ण झाल्याचें दाखवितो. आतां ग्रह व अतिग्रह आर्तभागाला माहित असतां त्यानें प्रश्न केला किंवा माहित नसल्यामुळे प्रश्न केला ( असे दोन पक्ष होतील ). जर ग्रह व अतिग्रह आर्तभागाला माहित होते, तर त्यांचा संख्यागुण ( ते किती आहेत ही गोष्ट ) त्याला माहित असल्यामुळे ग्रह किती व अतिग्रह किती हा प्रश्न योग्य होत नाही. आतां त्याला माहित नव्हतें असें घेतलें असतां ज्या पदार्थांची संख्या विचारली ते पदार्थ कोणते, ह्मणजे ग्रह कोणते, व अतिमह कोणते, असेंच आर्तभागानें विचारणें जरूर होतें. ग्रह किती आहेत व अतिग्रह किती आहेत ? असा प्रश्न केला नसता. शिवाय सामान्य स्वरूप माहित असतांना विशेष स्वरूप जाणावयाचें असल तर प्रश्न १ – बारीक पाण्याचे बारीक ओहोळ वाहत असतात त्यांस पाट ह्मणतात. पाटापासून शेत भिजतें, पिण्याचें पाणी मिळतें, व हातपाय धुवावयास पाटाचें पाणी उपयोगी पडतें. घरास शोभा यावी ह्मणून दिवा टांगतात. त्यापासून उजेड होतो, जाणारायेणारास वाट समजते व दिव्याचे उजेडांत असणारे सर्व पदार्थ दिसतात. २- एका वाक्याचा एकच अर्थ निघतो असा सिद्धांत आहे..