पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. १. तो कामरूपी अतिग्रहानें धरिलेला आहे. 1" " प्राणेच ग्रह तो अपान अतिप्रहानें" ( धरिलेला आहे ) " वाणीच ग्रह, तो नाम ( संज्ञा ) रूप अतिग्रहानें (व्याप्त असतो ). " ह्याप्रमाणे आह्मीं त्र्यन्नविभागप्रकरणांत स्पष्ट केले आहे. शिवाय पुष्कळ विचारानें हैं ठरविलें आहे कीं, जें प्रवृ- सीला कारण होतें, तेंच निवृत्तीला कारण होत नाहीं. कित्येक, सर्व ( कर्म ) निवृत्तीला कारण ( निवृत्तस्थिति देणारें ) आहे, असे मानतात; म्हणूनच प्रथम प्रथमच्या (कर्मरूप ) मृत्यूपासून मुक्त होतो, व पुढच्या पुढच्या ( कर्मात ) पडतो तो त्यांतून मुक्त होण्याकरितांच ( ती कर्मे बाजूला टाकण्याकरितां ) पडतो, तद्रूप होण्या- करितां त्यांत पडतो असें नाहीं. ह्यावरून ( एकंदर ) द्वैताचा क्षय होईपर्यंत सर्व ( कर्मों ) मृत्यु ( स्वरूप ) आहेत, परंतु द्वैतक्षय झाला ह्मणजे मृत्यूच्या व्याप्तींतून खरा अतिमुक्त होतो, याकरितांच दर्म्यान गौण (कमी दर्जाची ) आपेक्षिक (आवडेल ती ) मुक्ति आहे. 66 हैं सर्व असें ( ह्मणणें ) बृहदारण्यकोपनिषदाबाहेरचें आहे. “ सर्वांचा एकपणा मोक्ष " त्यापासून ( ब्रह्मापासून ) तें सर्व उत्पन्न झालें" अशी श्रुति आहे, असें कोणी ह्मणेल तर होय, तसेंही आहे; परंतु "गांवाच्या इच्छेनें यज्ञ करावा,” “पशूची इच्छा धरणारानें यज्ञ करावा. " वगैरे श्रुति आहेत, त्या ब्रम्हप्राप्तीकरितां आहेत असें नाहीं. गांव, पशू, स्वर्ग वगैरे प्राप्त होण्या करितां या श्रुति नाहीत, अद्वैतब्रह्मप्राप्तीकरितां या श्रुति आहेत, असें असतें तर प्राम, पशू, स्वर्ग वगैरे (पदार्थ) कोणी पत्करले नसते; पण भिन्नभिन्न कर्मीची भिन्नभिन्न विशेष फलें पत्कर. तात. आणि ( सर्व ) वैदिक कर्मे तत्प्राप्त्यर्थच (ब्रह्मप्राप्त्यर्थ ) असती तर संसारच उत्पन्न झाला नसता. आतां ( कर्मों ) तदर्थ (ब्रह्मप्राप्त्यर्थ ) असली तरी संसार हा तज्जनित (कर्म) पदार्थाचा स्वभाव आहे. उदाहरण, स्वरूपें पाहण्याकरितां प्रकाश आहे तरी त्यांतील सर्व पदार्थ प्रकाशित होतातच. असें ह्मणाल तर तसें नाहीं. ( ह्या ह्मणण्याला ) प्रमाण नाहीं. अद्वैत ब्रह्मप्राप्तीकरितां ज्ञानसहित वैदिक कर्मों केलीं असतां 'अन्य ( संसार बंध ) निष्पन्न होतो असे म्हणण्याला प्रमाण नाही. प्रत्यक्ष ( प्रमाण ) नाहीं, अनुमान ( प्रमाण ) नाहीं; आणि म्हणूनच ( श्रुति- १ - पहा दुसरी ऋचा. २ - बृह. १ – ५ – २ ३ – स्वर्ग मिळविण्याच्या यागाचे आज्ञेनें देह आत्मा नव्हे हे कळतें, गोदोहन विधीमध्यें कर्मा- धिकार स्वाधीन नाहीं असें कळते. नित्य नैमित्तिक विधीमध्यें कांहीं निराळे प्राप्त करून घेण्याचा उपदेश असतो त्यामुळे स्वच्छन्दप्रवृत्ति बंद होतें. निषेध वाक्यानीं स्वाभाविक प्रवृत्ति बंद होते. याप्रमाणें सर्वच कर्मकांड निवृत्ति उत्पन्न करणारे व मोक्ष देणारे आहे-आनंदगिरि, ४ - अध्याय ३, ब्राह्मण १, ऋचा ३ वगैरे ह्यांतील मुक्ति, ५ - अध्याय १, ब्राह्मण ४, ऋचा १०. ६ – सर्व एकच ब्रह्म आहे तर कर्मों सर्व ब्रह्मच आहेत, आणि ब्रह्मप्रापक आहेत, झणून केर्ली - पाहिजेत.