पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. ८-१०.] अश्वलब्राह्मण-संपत्ति. वाणी (ह्या दोन) वांटा;” त्यांपैकी एक वाट ब्रह्मा मनानें संस्कारयुक्त करितो. त्यावरून मन हीच देवता, तिच्या बलानें ब्रह्मा यज्ञरक्षण करतो, आणि तें मन, त्याच्या वृत्ति भिन्नभिन्न असल्यामुळे, अनंत आहे. 'खरोखरी' (वै ) हें अव्यय प्रसिद्ध गोष्ट दाखविण्याकरितां घातलें आहे. मनाचा अनंतपणा प्रसिद्ध आहे. मनाच्या अनंतपणाविषयीं अभिमान धरणारे देव, विश्वेदेव अनंतच आहेत. “ सर्व देव ज्या मनांत एकत्र होतात, " वगैरे अन्य श्रुति आहेत. असें ( मनाचे व लोकांचे ) अनंतपणाचे संबंधानें साम्य असल्यामुळे यजमान अनंत लोकाप्रत जातो. - ऋचा १० – याज्ञवल्क्या, अशी हाक मारून (अश्वलानें ) पुन्हां प्रश्न केला. आज ह्या यज्ञामध्यें उगाताऋत्विज स्तोत्रिय ऋचा किती ह्मणेल ? (उत्तर) तीन. त्या तीन कोणत्या ? ( १ ) पुरोनुवाक्या, (२) याज्या, ( ३ ) शस्या, ती तिसरी. ज्या अध्यात्म ( शारीरिक ) तीन ऋचा आहेत, त्या कोणत्या ? प्राण तीच पुरोनुवाक्या, अपान ती याज्या, व्यान ती शस्या. त्यां तिहीं ( ऋचां) नीं काय संपादन करितो ? पुरोनुवाक्या ( प्राण ) या ऋचेनें पृथ्वीलोकच संपादितो. याज्या (अपान ) या ऋचेनें अंतरिक्षलोक संपादितो. शस्या (व्यान) या ऋचेनें स्वर्गलोक संपादितो. त्यानंतर अश्वल होता स्तब्ध झाला. भाष्य–' याज्ञवल्क्या, अशी हांक मारून प्रश्न केला,' हें पूर्वीप्रमाणे किती स्तोत्रिय ( स्तवनाच्या ऋचा ) हा उद्गाता ह्मणेल ? स्तोत्रिये ह्मणजे कित्येक सामऋचांचा समुदाय. स्तोत्रिय ऋचा घ्या, शस्य ऋचा घ्या, किंवा कोणत्याही ऋचा घ्या, त्या सर्व तीनच असें ( याज्ञवल्क्य ) ह्मणतो. त्या (१) पुरोनुवाक्या, (२) याज्या, ( ३ ) व शस्या तिसरी ह्मणून ( याज्ञवल्क्यानें ) सांगितल्या. ह्या ( च ब्राह्मणां ) त पूर्वी सांगितलें कीं, प्राण धारण करणारें जें कांहीं हें सर्व (तें यजमान ) प्राप्त करून घेतो; तर ( प्राप्य विषय व ऋचा) यांत सारखेपणा कोणता आहे, हे येथें सांगितलें. ज्या ( प्राणभृत् ) शरीर होतात, त्या तीन ऋचा कोणत्या ? 'प्राण' तोच 'पुरोनुवाक्या' ( ह्या दोन्ही शब्दांच्या आरंभी ) पकार समान आहे. 'अपान' (ती) 'याज्या' ही दोन्हीं ( पहिल्या दोहोंच्या ) मागून येतात. अंपानवायूच्या बलानेंच दिलेला हविर्भाग देवता भक्षण करितात. याग करणें ह्मणजें १ -- वांटा - ब्रह्माऋत्विज केवळ मनानें ह्मणजे मौन धरून वांट शुद्ध करतो. तो बोलल्यास त्याला प्रायश्चित करावें लागते. असें छांदोग्यांत सांगितले आहे. - २ – स्तोत्रिया - ऋचा किंवा श्लोक गाण्याचे सुराने मोठ्यानें झटले ह्मणजे त्याला स्तोत्र ह्मणतात. सामगायनांतील सुरांवर ऋचा ह्मणतात त्यांस स्तोत्रिय ऋचा ह्मणतात. साध्या सुरानें ऋचा हाटल्या तर त्यांनां शस्त्र ह्मणतात. ३ - नाभीच्याखालीं अपानवायूचा संचार आहे, त्या वायूनें खाल्लेले अन्न पचतें, ही गोष्ट दे- बांसही लागू केलेली आहे.