पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. १. होमात टाकिल्या ह्मणजे प्रकाशयुक्त जळतात. ज्या आहुति फार ओरडतात किंवा शब्द क त्या मांसाच्या वगैरे असतात. ज्या आहुति होमाच्या तळीं जाऊन भूमीवर पसरतात, त्या दुधाच्या किंवा सोमरसाच्या असतात. त्या आहुतींनीं काय जिंकितो ? ह्याप्रमाणें समर्पण केल्यानें ( फलें ) कोणती मिळवितो ? ज्या आहुति दिल्याबरोबर भडक जाळ होतो, त्या भडक प्रकाशाच्या आहुति समर्पिल्या, आणि ज्याला देवलोक ह्मणतात तें फल प्रकाशयुक्तच आहे; ह्या सादृश्यावरून ज्या मी ह्या उजळ आहुति समर्पण केल्या, त्या ह्या प्रत्यक्ष देवलोकरूपी कर्म फलाचें स्वरूप होत. ज्याला देवलोक ह्मणतात, तेंच फल मी सिद्ध करित आहें असें यजमान मानितो. ज्या आहुति दिल्या असतां बहुत शब्द करितात, त्यां (आहुती ) च्या योगानें ( यजमान ) पितृलोक मिळवितो; कारण ( दोहोंमध्यें ) कुत्सित शब्द उप्तन्न करण्याचा सार- खेपणा आहे. पितृलोकाला जोडलेल्या संयमनी ( यमपुरी ) मध्यें ज्यांस ( यम ) यातना होत असतात, ते जीव 'अरे आम्ही मेलों! सोड ! सोड !' असे शब्द करितात. तशा (मांसाच्या वगैरे ) अवदानाच्या आहुति ओरडतात. त्यावरून त्यांत व पितृलोकांत सादृश्य असल्यामुळे मी पितृलोक सिद्ध करित आहें असें ( यजमान.) मानितो. ज्या आहुति दिल्याबरोबर खाल ( भूमीवर ) पसरतात, त्यांच्या योगानें मर्त्यलोक प्राप्त होतो; कारण दोन्ही भूमीवर आहेत, हें त्यांत सादृश्य आहे. मुळांत मर्त्यलोक खाली असल्यासारखा आहे, असें झटलें; कारण, तो खालींच आहे. वर असणारे लोक प्राप्त करून घ्यावयाचे, त्यांपेक्षां तो खाली आहे; किंवा (पापी मनुष्यें ) खालीं भूमीवर जातात, ह्या संबंधानें दूध व सोम यांच्या आहुति देतांना ( यजमान ) मी मनुष्यलोक सिद्ध करित आहे अशी कल्पना करितो. - ऋचा ९ – याज्ञवल्क्या, अशी हाक मारून (अश्वलानें ) पुन्हा प्रश्न केला. आज हा ब्रह्माऋत्विज दक्षिणेस बसून किती देवतांनीं यज्ञाचें रक्षण करीत आहे ? एक देवतेनें. ती एक देवता कोण ? मनच ती देवता. मन खरोखरीं अनंत आहे. विश्वेदेव अनंत आहेत. त्या मनानें यजमान अनंत लोकामत जातो. भाष्य – ' याज्ञवल्क्या, अशी हांक मारून तो ह्मणाला' हें पूर्वीप्रमाणें. हा ब्रह्माऋत्विज दक्षिण दिशेस ब्रह्मासनावर बसून यज्ञ राखितो. किती देवतांनीं राखितो ? असा बहुवचनीं प्रश्न ( पूर्वानुक्रमावरून) प्रसंगवशात् केला आहे; कारण तो एके देवतेनें ( यज्ञ ) रक्षण करतो, असें (अश्वलाला) ठाऊक असतांना स्वतः जाणणाऱ्यानें बहुवचनीं प्रश्न करणें योग्य नाहीं; ह्मणन पूर्वीच्या दोन प्रकरणांत असणारे प्रश्नोत्तरांमध्ये कितींनी किती, तिहींनीं तीन, असा (अनुवृत्ति ) प्रसंग पाहून ह्या ठिकाणी देखील बहुवचनानेंच प्रश्नाचा उपक्रम केला आहे. अथवा प्रत्युत्तर देणारास भ्रम पडावा ह्मणून बहुवचन ( योजिलें आहे). दुसऱ्यानें ( याज्ञवल्क्यानें ) झटलें, एक देवतेनें; ह्मणजे ज्या देवतेच्या बलानें ब्रह्मा दक्षिणेस आसनावर बसून यज्ञ राखितो, ती देवता एक आहे. ती एक (देवता) कोणती ? मनच; ह्मणजे मनच ती देवता; कारण ब्रह्मा मनानें ध्यान करण्यांत गुंतलेला असतो. अन्य श्रुतते हाटलें आहे. " त्या यज्ञाच्या मन व १ --आहवनीय अनांच्या दक्षिणदिशेस ब्रम्ह्याचें आसन असतें. २ -- छांदोग्य १-२-४, १६ .