पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. १ 29 ● हविर्भाग देणें. ‘ व्यान ' ती ' शस्या '. " प्राण किंवा अपान बाहेर न टाकतां (शस्या ) ह्मणतो ' अशीं अन्य श्रुति आहे. ह्या (तीन) ऋचांनी यजमानाला काय प्राप्त होतें, हें पूर्वी सांगितलें; त्यांत ऋचांचे शरीराशीं विशेष संबंध सांगितले नव्हते, ते येथें सांगितले; बाकी सर्व (पूर्वी) सांगितलें. ( या ऋचाचा तिन्ही ) लोकांशी समान संबंध आहे, त्यामुळें, ( यजमान ) पुरोनु - वाक्या ऋचेनें पृथ्वीलोक, व याज्येनें अंतरिक्ष लोक मिळवितो. याज्या व अंतरिक्ष लोक मध्य- भागी आहेत हें त्यांतील साम्य. शस्येनें स्वर्गलोक मिळवितो; कारण शस्या व स्वर्गलोक हीं शेवटी येतात ह्मणून समान आहेत. ( इतकें भाषण झालें ); नंतर आपले प्रश्नाचा निकाल लागला असें मानून होता अश्वल स्तब्ध झाला. हा याज्ञवल्क्य आपल्या आटोक्यांत नाही, ( असें त्यास वाटलें ). अध्याय ३, अश्वलब्राह्मण समाप्त. १ – “ अप्राणन्ननपानन्नृचमभिव्याहरति." छा. १-३-३, ४, ५.