पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. ६-८.] अश्वलब्राह्मण-संपत्ति. ऐवजी नुसती तोंडानें ह्मणावी असें जालें असतें; ह्मणून संपत्तीनें (संपादणुकीनें) त्यांस फलप्राप्ति ठेवली, यावरून संपत्तीचाही उपयोग आहे, ह्मणून त्यांचें वर्णन आरंभिलें आहे. ऋचा ७ – हे याज्ञवल्क्या, अशी हाक मारून ( अश्वलानें ) पुन्हां प्रश्न केला. आज हा होता किती ऋचांनी ह्या यज्ञामध्यें (शंसन ) करील? तीन ऋचांनीं करील, असें ( याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें ). कोणत्या तीन ऋचांनीं ? पुरोनुवाक्या, याज्या, (व) शस्या ही तिसरी. त्या (ऋचां) नीं काय जिंकील ? जें कांहीं हें प्राण धारण करणारें (त्रैलोक्य आहे ) तें जिंकील. भाष्य- (याज्ञवल्क्यानें) आपणाकडे पहावें ह्मणून, (अश्वल) याज्ञवल्क्या, अशी (त्याला) हाक मारून ह्मणाला, किती ऋचांनी आज हा होता ऋत्विज ह्या यज्ञामध्यें शेरु शंसन करितो ? दुसन्यानें उत्तर दिलें, तीन ऋक्समुदायांनी. असें ह्मटल्यावर अश्वल पुनः प्रश्न करितो; त्या तीन कोणत्या ! हा प्रश्न तीन संख्येने निर्दिष्ट केलेल्या वस्तूंविषयीं आहे. पहिला प्रश्न ( फक्त ) संख्ये- बद्दल होता. पुरानुवाक्या ह्मणजे-ज्या ऋचा यागकालापूर्वी योजितात त्या ऋक्समुदायास 'पुरोनु - वाक्या' असे ह्यणतात. यागकाळी ज्या ऋचांचा उपयोग करितात, ती ऋग्जाति 'याज्या.' शंसन कर्माचे वेळीं ज्या ऋचा ह्मणतात, त्या जातीच्या ऋचांनां 'शस्या' ह्मणतात. कोणत्याहि जाती- च्या ज्या सर्व ऋचा, ह्मणजे स्तोताऋत्विजाच्या ऋचा किंवा दुसऱ्या, या सर्व ऋचांचा ह्या (सदरीं सांगितलेल्या) तीन जातींच्या ऋचांमध्ये अंतर्भाव होतो. त्या ऋचांनी काय जिंकितो ह्मणाल तर, जें कांहीं हैं प्राणधारण करणारें आहे तें ( मिळतें). (तीन लोक व तीन जातींच्या ऋचा ) यांजमध्यें संख्यासादृश्य आहे यावरून (त्रैलोक्यांतील ) प्राणधारण करणारें जें कांही आहे तें सर्व मिळतें. तें सर्व फल (यजमान) संपादितो. संख्यासादृश्यावरून ( आपणांस त्रैलोक्य प्राप्त झालें, असें कल्पितो.) ऋचा ८- - याज्ञवल्क्या, अशी हाक मारून (अश्वलानें ) आणखी भाषण केलें., आज हा अध्वर्युऋत्विज या यज्ञामध्यें किती आहुति हवन करील ? तीन. त्या तीन को- णत्या ? (१) ज्यांचा होम केला असतां लखलखीत जळतात, (२) ज्या अग्नींत टाकिल्या ह्मणजे मोठमोठयानें ओरडतात, (३) ज्यांचा होम केला असतां खालीं तळाशीं बसतात. त्यांपासून कोणतें फल प्राप्त होते ? ज्या लखलखीत जळतात त्यांच्या योगानें दिव्य स्वर्गलोक प्राप्त होतो, ज्या ओरडतात ( चरचर असा शब्द करतात) त्या पितृलोकाला पोहोंचवितात, ज्या टाकिल्या असतां (कुंडाच्या तळाशीं) खालीं जातात, त्यांच्या योगानें मनुष्य लोक मिळतो; ( कां तर ) मनुष्यलोक खाली असल्यासारिखा आहे. भाष्य - -हे याज्ञवल्क्या, असें बोलला हें पूर्वीप्रमाणेच. आज हा अध्वर्यु ऋत्विज या यज्ञांत किती आहुतींचें हवन करील? आहुतींचे प्रकार किती आहेत ? तीन आहेत. त्या तीन (आहुति ). कोणत्या हें पूर्वीप्रमाणे. दुसरा ( याज्ञवल्क्य) उत्तर देतो, ज्या समिधा व तूप ह्यांच्या आहुतिया १ – होता ज्या ऋचा झणतो त्यांना शस्त्रें ह्मणतात; व शंसन झणजे शस्त्रें ह्मणणे.