पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अं. ३ ब्रां. १. भाष्य - -मृत्युरूपी कालापासून यजमानाची अतिमुक्ति सांगितली. तो (यजमान ) अति मुक्त ( होतांना ) कोणत्या आधारानें मर्यादित ( परिच्छिन्न) गोष्टींच्या संबधाच्या मृत्यूच्या पली- कडे जाऊन फल मिळवितो, आतिमुक्त होतो- ह्या विषयीं श्रुति सांगते की जें हैं प्रसिद्ध अंतरिक्ष किंवा आकाश निराधार (दिसतें) - जणूं ( इव ) शब्दावरून त्यालाही आधार आहे, पण तो ध्या- नांत येत नाहीं असें ह्मणण्याचा (श्रुतीचा) अभिप्राय आहे-आतां जो आधार ध्यानांत येत नाहीं तो कोणता ? असें “केन” (कोणत्या) सर्वनामानें विचारलें आहे. (स्वर्गलोकांप्रत जाण्यास आधार किंवा पायरी) नसेल तर (स्वर्गरूप) फलप्राप्ति होण्याचा इतर रीतीनें संभव नाही. ज्या आधारानें (किंवा पायरीनें) यजमान कर्मफलाप्रत पोंचून अतिमुक्त होतो, तो (आधार) कोणता ? असा प्रश्न आहे; पोहोंचून कोणत्या आधारानें स्वर्गलोकास चढतो-स्वर्गलोकफल पावतो-अतिमुक्त होतो असा अर्थ. (याज्ञवल्क्याचें उत्तर ) 'ब्रह्मऋत्विज, मन, चंद्र, या शब्दांची योजना पूर्वीप्रमाणें-त्यांत अध्यात्म ( शारीरिक ) यज्ञस्वरूपी यजमानाचें जें हें प्रसिद्ध मन आहे, तो हा चंद्र आधिदैवत (देवतात्मक) होय. मन शारीरिक आहे (व) चंद्र आधिदैवत (देवरूप) आहे, हे प्रसिद्धच आहे. तोच चंद्र ब्रह्मा- ऋत्विज ह्मणून आधिभौतिक (पंचमहाभूतात्मक ) ब्रह्मयाचें स्वरूप व मनाचें स्वरूप. ही दोन्हीं परिछिन्न असून अपरिछिन्न (ह्मणजे) अमर्यादित जें चंद्राचें देवतारूप आहे त्या रूपानें पहातो; ह्मणजे चंद्ररूप मनाच्या आधारानें (यजमान) कर्मफलरूप स्वर्गलोकांप्रत जातो, अतिमुक्त होतो- असा भावार्थ आहे. (अतिमुक्ति शब्दापुढे ) मुळांत 'इति' शब्द आहे तो उपसंहाराऐवजी आहे. याप्रकारचे मृत्यूपासून ( इतर प्राणेंद्रियांचे ) अतिमोक्ष होतात. हे सर्व यज्ञांगांच्या ज्ञानाचे (दर्शनाचे ) प्रकार या ठिकाणी सांगितले आहेत; ह्मणून मुळांत ' अतिमोक्षाः' असा उपसंहार केला आहे. अतिमोक्ष तेवढे अशा प्रकारचे आहेत असा अर्थ घ्यावा. " मग संपत्ति ' ( अशी पदें आहेत त्यांपैकी ) 'मग' ह्मणजे आतां, 'संपत्ति' ( संपादणुकी) सांगण्यांत येतात. 'संपत्' (संपत्ति) झणजे काय ? ( कर्मपणाच्या वगैरे ) कोंणं- त्या तरी साम्यावरून फल देणारी अग्निहोत्रादिक कर्मे करून (मोठ्या यागांच्या) विशिष्ट फलाची किंवा केवळ फलाची संपादणी. पूर्ण उत्साहानें फलसाधनीभूत कर्माचें अनुष्ठान प्रय- त्नानें करीत असतां जेव्हां (सामग्रीच्या वगैरे ) कोणत्या तरी न्यूनतेमुळे (त्यांस त्या कर्माचें फल प्राप्त होण्याचा ) संभव नसतो, तेव्हां अग्निहोत्री असला ह्मणजे अग्निहोत्र वगैरे पैकी एकादें कर्म साधेल तें घेऊन तोच आधार करून त्या कर्माचें फल जाणत असला तर जें कर्म व्हावें ह्मणून इच्छा करतो त्याचें फल संपादितो ( प्राप्त झाले अशी कल्पना करितो ). असें न केलें तर राजसूययज्ञ, अश्वमेध, पुरुषमेध, सर्वमेध, वगैरे यज्ञ करण्यास तीन वर्णाच्या लोकांस अधिकार आहे. पण ज्यांनी ते करण्याचा (गरिबीमुळें) संभव नाही, त्यांनी तीं मखवर्णनें स्वाध्याया- १- अश्वमेधासारख्या मोठमोठ्या यागांची कल्पना करणे. २- तुपाची आहुती द्रोणांत तयार करितात, आणि त्यांत तोंड पाहून हें तूप स्वर्गलोकाप्रमाणें स्वच्छ आहे अशी कल्पना करितात. पण त्या तुपाला स्वर्गप्रेकाची उपमा देण्यासारखा गुण त्यामध्यें एक उजळ- पणा ( स्वच्छपणा ) मात्र असतो.