पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १-२. ] अश्वलब्राह्मण - मृत्युमुक्ति-अतिमुक्ति. ३ ऋचा २. - त्यांस मग (जनकानें) भाषण केलें कीं, हे पूज्य ब्राह्मण हो, तुमच्या मध्यें जो ब्रह्मिष्ठ असेल तो ह्या गायी घेऊन जावो. तेव्हां ते ब्राह्मण धजावले नाहींत. मग याज्ञवल्क्य हा आपल्याच ब्रह्मचाऱ्याला म्हणाला, बाबा सामश्रव्या, ह्या घेऊन जा. त्या (गायी तो ) सोडून घेऊन चालला, तेव्हां ते ब्राह्मण, आमच्या समोर हा ब्रह्मिष्ठ कसें म्हणविणार ! अर्से (मनांत आणून ) रागावले. मग वैदेह जनकराजाचा अश्वल ह्मणून हौत्र करणारा (ऋत्विज ) होता, त्यानें ह्यास प्रश्न केला; हे याज्ञवल्क्या, तूंच काय तो आमच्यामध्यें ब्राह्मष्ठ आहेस? त्यास यानें उत्तर केलें. आह्मीं ब्रह्मिष्टाला नमस्कार करितों. (पण) गायी प्राप्त व्हाव्या, हीच आमची इच्छा आहे. त्यावरूनच त्यास मग अश्वल होत्यानें प्रश्न करण्याचें मनांत आणिलें. भाष्य - ( जनक राजानें ) वर सांगितल्याप्रमाणें गायी (गोठ्यांत) बांधून त्या ( जम- लेल्या) ब्राह्मणांस भाषण केलें. 'हे पूज्य ब्राह्मण हो,' अशी हाक मारून, तुमच्यामध्यें जो ब्रह्मिष्ठ असेल (ह्मणजे ) तुझी सर्व ब्रह्म जाणणारे आहांत, त्यांत जो उत्कृष्ट ब्रह्म जाणणारा (ब्रह्मिष्ठ) असेल, तो ह्या गायी आपल्या घराला घेऊन जावो. तेव्हां त्या ब्राह्मणांनी धाष्टर्च केलें नाहीं; त्या ब्राह्मणांनीं तें भाषण ऐकून आपल्या ब्रह्मिष्ठपणाबद्दल प्रतिज्ञा करण्याचें धैर्य केलें नाहीं; ते पुढे झाले नाहींत. त्या ब्राह्मणांनी मौन धरल्यावर याज्ञवल्क्य, आपल्या ब्रह्मचारी शिष्याला ह्मणाला, बाबा, या गायी आमच्या घरी घेऊन जा. 'बाबा साश्रव्या' (अशी हांक मारली); कारण तो सामवेदाचे पाठ ऐकत असे, त्यावरून अर्थात् याज्ञवल्क्य चतुर्वेदी होता. त्या गायी त्यानें ( सामश्रव्यानें ) आचार्याच्या घरी नेल्या. याज्ञवल्क्यानें आपण ब्रह्मिष्ठ असल्याची प्रतिज्ञा केली, असें त्यानें ब्रह्मिष्ठाला देण्याकरितां जें जनकानें द्रव्य पणाला लाविलें होतें तें स्वीकारल्या- मुळे सिद्ध झालें. तेव्हां ब्राह्मण कोपले. त्यांना क्रोध येण्यास हेतु काय होता हैं श्रुति सांगते. आह्मी एकएक जण मुख्य असून आमच्या समोर ह्यानें मीं ब्रह्मिष्ट आहें असें कसें ह्मणावें ! मग ते ब्राह्मण याप्रमाणें क्षुब्ध झाल्यावर यज्ञ करणाऱ्या जनक राजाचा अश्वले नांवाचा हौत्र करणारा ऋत्विज होता. तो ब्रह्मिष्टपणाचा अभिमानी असून त्यास राजाश्रय होता; ह्मणून त्यानें १ – मॉक्स मुल्लर (Max Muller) साहेबांनीं 'सामश्रव्या' हें संबोधन याज्ञवल्क्याकडे लावलें आहे. पण आचार्याच्या भाप्यावरून तसें दिसत नाहीं. २–यज्ञांत चार मुख्य ऋत्विज असतात. (१) होता, (२) अध्वर्यु, (३) उद्गाता, (४) ब्रह्मा. ३ –ज्यांनीं वेदाचें अध्ययन करून त्यांचा अर्थ समजण्याविषयीं निष्ठा ठेविलेली असते, त्यांस ब्राह्मण म्हणतात. ४ – याज्ञवल्क्य ऋषि यजुर्वेदी होता, त्यापासून त्याचा ब्रह्मचारी शिष्य सामवेद श्रवण करीत होता. ऋग्वेदावर सामवेद अवलंबून आहे, यावरून तीन वेद व तदंतर्गत अथर्ववेद याज्ञवल्क्याला येत होते, व तो चतुर्वेदी ऋषि होता, असें सिद्ध होतें. ५ - अश्वल राजाश्रित असल्यामुळे त्यानें प्रथम प्रश्न केला.