पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. १. उद्धटपणानें याज्ञवल्क्याला प्रश्न केला. आमच्या मध्यें तूंच कर्ता ब्रह्मिष्ठ आहेस-(आहेस हे पद) मूळांत लांबट झटले आहे, तें निंदेनें ह्मटलें आहे. १. - मग याज्ञवल्क्यानें उत्तर दिलें, ब्रह्मिष्ठाला नमस्कार असो. तूर्त आह्मांस गायींची इच्छा आहे. ह्यावरून ब्रह्मिष्ठपणाची प्रतिज्ञा त्यानें केली, व ब्रह्मिष्ठाला देऊं केलेला पण (ठेविलेले द्रव्य ) त्यानें स्वीकारिला एवढ्यावरूनच अश्वल होत्यानें त्यास प्रश्न करावा, असें मनांत आणिलें. ४ ऋचा ३ – हे याज्ञवल्क्या, अशी हाक मारून (अश्वल ) म्हणाला, जें हें सगळे मृत्यूनें व्याप्त आहे, सगळें मृत्यूनें आपलेंसें केलें आहे; ( त्यांतून ) कोणत्या (ज्ञाना) ने यजमान मृत्यूची व्याप्ति मार्गे टाकून मुक्त होतो ? (उत्तर) - होताऋत्विज, अमि, वाणी, ( ह्यांच्या बलानें ). वाणी हीच यजमानाचा होता-ऋत्विज होय. त्यांत जी ही वाणी तोच हा अग्नि होय; व तो (च) होता (ऋत्विज). तो मुक्ति, (आणि) ती (च) अतिमुक्ति. भाष्य –' याज्ञवल्क्या, अशी हाक मारून ह्मणाला' ( वगैरे ). ( पूर्वीच्या अध्यायांत) मंधुकांडामध्यें पाङ्क्त ( पंचविध ) कर्म ज्ञानयुक्त असेल तर तें करून यजमान मृत्यूपलीकडे जातो असें सांगितलें. उद्गीथ प्रकरणांत संक्षेपानें तेंच सांगितलें. त्याच्याच विवेचनाचा हा विषय आहे व त्यासंबंधानें जें विशेष ज्ञान पाहिजे, तें स्पष्ट करण्याकरितां हा विस्तृत ग्रंथ आरंभला आहे. ह्या ( यज्ञ ) कर्माचा ऋत्विज, अग्नि, वगैरे जो साधनसमुदाय आहे, तो (मनुष्य) स्वभावानुरूप आ- सक्तिसहित कर्मस्वरूपं मृत्यूनें व्याप्त असतो. केवळ व्याप्त असतो, एवढेच नव्हे; मृत्यूनें आपल्या स्वाधीन ठेविलेला असतो. कोणत्या ज्ञानस्वरूप उपायानें यजमान मुत्युवशता मागें टाकून मुक्त होतो, व स्वतंत्र होऊन मृत्यूच्या स्वाधीन रहात नाही, अशा अर्थाचा प्रश्न आहे. उद्गीथ प्रकरणांतच ज्या योगानें ह्मणजे मुखांतील प्राणरूप आत्मसाक्षात्कारानें मुक्त होतो असे सांगितलें ना ? ( मग अशी शंका कां आली १ ) खरें; पण एक विशेष गोष्ट तेथें सांगितली नाहीं, ती सांगण्या- करितां हा यत्न आहे; ह्मणून ( पुनरुक्ति ) दोष येत नाहीं. याज्ञवल्क्य ह्मणतो, 'होताऋत्विज, अग्नि, वाणी यांच्या बलानें, याचा अर्थ (श्रुति) स्पष्ट करिते. ज्याच्या योगानें (यजमान) मृत्यूपलीकडे जातो तो होता कोण ? तर 'वाणी हीच यज्ञाचा १ - या प्रश्नाचा अभिप्राय ब्रह्मज्ञानी उद्धटपणा करीत नाहीत, हें सुचविण्याचा आहे. २ - अध्याय २, ब्राम्हण ५. ३ – मन, वाणी, प्राण, चक्षु, व श्रोत्र ह्या पांचांनी केलेलें पांक्त अथवा पंचविध कर्म (१-४-१७) यथाक्रमानें ४८ संस्कारांतील सर्व यज्ञ, ज्ञानसंपादन करून केले असतां, मुक्ति प्राप्त होते. पांक्त ह्मणजे यथाक्रम असाही अर्थ होईल. ४ - अध्याय १, ब्राह्मण ३. ५–वाणी अग्निस्वरूपी व होतृस्वरूपी आहे, हे विशेष ज्ञान. ६–“ परिच्छेदकृदज्ञानं सासंगं मृत्युसंज्ञितं " परिच्छेद ( ब्रह्मक्षत्रादि भेद ) करणारें आसक्ति- युक्त अज्ञान (रागद्वेषोत्पादक आंतिज्ञान ) हाच मृत्यु. सुरेश्वर वार्तिक. पृ. ११४०. ७—प्रत्येक इंद्रियाला (प्राणाला) मृत्यूपासून मुक्त होण्याला विशेष साधन कोणतें, हैं या (अश्वल) काडांत सांगितले आहे. पहा- मिताक्षरा.