पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. १. यांतील गोष्ट तत्वज्ञानाची प्रशंसा करण्याकरितां किंवा (ज्ञानाचे ) उपाये सांगण्याकरित आहे; कारण दानरूप उपाय प्रसिद्ध आहे, व तो विद्वानांना शास्त्रांतही सांपडलेला आहे. 'दाना- नेंच प्राणी नम्र होतात.' प्रकृत गोष्टींत हजार गायी व पुष्कळ सुवर्ण देण्याकरितां काढले आहे. त्यावरून (तत्वज्ञानरूप ) अन्यविषयक शास्त्र असूनही विद्याप्राप्तीला दान साधनीभूत आहे हें दाखविण्याकरितां गोष्ट आरंभिली. शिवाय तेर्कविद्येत आढळतें कीं, वेद्यार्थीच्या ज्ञानानें जे संपन्न असतील, त्यांचा समागम, व त्यांशीं वाद करणें, हा विद्याप्राप्तीचा उपाय आहे. या अध्यायांत हा प्रकार विशेषेकरून व्यक्त केला आहे. विद्वानांचा समागम झाला असतां बुद्धि वाढते, हा प्रत्यक्ष अनुभव आहे; याकरितां (प्रकृत ) गोष्ट विद्याप्राप्तीचा उपाय दाखविण्याकरितांच आहे. जनक नांवाचा विदेह देशाचा सौर्वभौम राजा होता. त्या देशांत त्याचा जन्म ( ह्मणून तो ) वैदेह. त्यानें बहुदक्षिण यज्ञ केला. बहुदक्षिण नांवाचा यज्ञ अन्य शाखेंत प्रसिद्ध आहे; अथवा अश्वमेघांतही पुष्कळ दक्षिणा दिली जाते ह्मणून ( अश्वमेधच ) या ठिकाणी बहुदक्षिण शब्दानें घ्यावा; ह्या यज्ञांत निमंत्रणावरून अगर ( यज्ञ ) पाहण्याच्या इच्छेनें कुरु देशांतील व पंचाल देशांतील ब्राह्मण (आले होते ). त्या देशांत पुष्कळ विद्वान् असल्याचें प्रसिद्ध आहे. ( ते ) एकत्र गोळा झाले तेव्हां, ( तो ) मोठा विद्वत्समुदाय पाहून त्या यज्ञ करणाऱ्या वैदेह जनक राजाला यांपैकी खरा ब्रह्मिष्ठं कोण आहे, हें मुख्यत्वें जाणण्याची इच्छा झाली. कोणत्या प्रकारची ? या ब्राह्मणामध्यें खरोखरी उत्तम पढीक कोण असावा ? हे सर्व पढीक आहेत; पण यांपैकी अतिशय पढलेला कोण असावा ? याप्रमाणें उत्तम पढीक कोण, याविषयीं जिज्ञासा त्यास उत्पन्न झाल्यावरून ती गोष्ट जाणण्याचा उपाय ह्मणून हजार तरुण गायी त्यानें गोठ्यांत बांधल्या. त्यांवर काय घालून बांधल्या होत्या, हें श्रुति सांगते. सोन्याच्या एक पलाच्या चवथ्या भागाला (झणजे एक तोळ्याला ) पाद (ह्मणतात). दहा दहा पाद (सोनें ). एकेका गायीच्या शिंगांवर बांधिलें होतें. ( झणजे) एक एक शिंगावर पांच पांच पाद ( पदकें ) होतीं. १ -- विद्या शिकण्यास दान साधनीभूत आहे असें प्रसिद्ध आहे. 'गुरुशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा । अथवा विद्यया विद्या चतुर्थ नोपलभ्यते" गुरुसेवेनें किंवा पुष्कळ धन दिल्यानें विद्या प्राप्त होते, अगर विद्येनें विद्या मिळते, चवर्थे साधन नाहीं. २ -- " अविज्ञाततत्वेर्थे कारणोपपत्तितस्तत्वज्ञानार्थमूहस्तर्क: " अर्थ-ज्या विषयांचें तत्व समजलें नाहीं त्यांत कारणाचें विवेचन करून तत्वज्ञान होण्याकरितां तर्क घ्यावा लागतो. पहा सुरेश्वर वार्तिक पृ. ११३ ३ --राजसूययज्ञ करून राज्याभिषेक करून घेतला झणजे सार्वभौम राजा होतो. त्याला सम्राट् ह्मणतात. " ५ – वैदेइ नांवांत गर्भित श्लेष आहे. ज्याला देहबुद्धि नाहीं तद्रूप. ५ -- जनकराजा सार्वभौम असल्यानें अश्वमेध करणे त्याला सहज होतें. ६ -- ब्रह्मा ह्मणजे ब्रह्म जाणणारा, आणि ब्रह्मिष्ठ ह्मणजे ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये उत्तम.