पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. ताटातूट केलेली नाही. या जन्मी जर मी सत्कत्ये केली असतील, अनाथ दुबळ्यादिकांची कार्ये केलेली असतील, गोब्राह्मणांचें प्रतिपालन केलेले असेल, श्रीशंकर आणखी श्रीविष्णु यांच्यांत भेदाभेद पाहिला नसेल, आणखी कायावाचामनेंकरून जर पतिव्रतेच्या धर्माप्रमाणे वागले असेन, तर मला पायाचे दर्शन लवकर होईल. आतां मला एकेक पळ युगाप्रमाणे वाटते आहे. भुकेनें प्राण व्याकुळ होत आहेत. चाळून चालून जीव थकून गेला. आतां एक पाऊल टाकण्याची सुद्धां शक्ति राहिली नाही. मटले ती दोन मुले-गोप्या आणखी गण्या,-माझी झालेली ही दीन अवस्था तिकडे कळवतील. कदाचित् दया आली तर आली, ह्मणून सकाळपासून शोधाकरितां पाठवलेली आहेत. पण त्यांचा अजून काही ठिकाण नाही. देवा, एकदा माझी गांठ पडूंदे, ह्मणजे माझा त्याग करून कसें जाणें होतें तें पहाते. ( गण्या व गोप्या प्रवेश करितात.) गण्या-अगदी आपल्या मागुनश्यानी येत होते. गोप्या-आन् येकायेकी जनु गडप झाले ! गण्या-आतां बाइसाहेबाला कस तोंड दावाव ? गोप्या-सरकारच्या मनामंदी मुळींच यायच नव्हत. पन आपुन परान द्यायाला तयार झालों, म्हुनशान आपल्या संग आल. आन् दिली राव झुकापुरी डोंगरांत, आन हाय काय ? गण्या-आमासनी मुलासनी सरकारानी फसवाव हा कांहीं चांगला इचार नाही. ( सईबाईचे जवळ येतात व सईबाईच्या पायां पडतात.) सई०-कायरे गण्या, गोप्या, मोठी प्रतिज्ञा करून गेला होता नारे ? मग बरोबर आणल्याशिवाय परत कसेरे आलांत ? (दुःखाने) तुमच्याकडे तरी काय दोष आहे ? माझ्या कर्मांत जे लिहिले असेल तें ब्रह्मदेवालासुद्धां टाळता येणार नाही. तुमची येण्याची मी