पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૮૨ श्रीतुकाराम. तोंपावेतों तिने या आंगठीकडे पाहून माझें स्मरण करीत असावें. (आंगठी मुलांच्या हाती देतो.) गण्या-सरकार मी असला निरोपबिरोप कायी सांगायचा न्हायी. गोप्या-सरकार येत नसत्याल तर ही कट्यार आम्ही आपल्या उरांत भोसकून घेतो. बाईसायबासनी आझी अस सांगितल की, सरकाराला आनल्याबिगर त्वांड दावनार नाहीं. शिवाजी-घे कट्यार कशी भोसकून घेतोस पाहूं. गोप्या-गण्या तुझ्या अदुगर मी भोसकून घेतो. गण्या-चल हट, तू लांब बस. अदुगर हा मर्द सरकाराच्या पायाप हा जीव ठेवनार. (उभयतांची आवेशानें झटापट लागते. शिवाजी भांडण सोडवितो.) शिवाजी-(एकीकडे ) कसे नशीब आहे ! पुनः पुनः मला मोहपाशांत गुंतवीत आहे. पण मी आतां साफ भुलणार नाही. या मुलांना मी जर आतां होय ह्मटले नाही, तर ही मुले छातीत कट्यार भोसकून प्राण सुद्धां देतील. आतां याला काय यक्ति काठावी ?-हं ठीक ही युक्ति बरी आहे. यांना डोंगरांत झुकापुरी देऊन कोठे तरी निघून गेले पाहिजे. ( उघड ) चला मी तमच्याबरोबर घरी येतो. मग तर काही हरकत नाहींना ? (त्रिवर्ग जातात.) प्रवेश २ रा. स्थळ-अरण्य. ( सईबाई प्रवेश करिते.) सई०-एका जन्मावरून तीन जन्मांची परीक्षा होते. पर्वजन्मी कोणाचे तरी लग्न मोडले आहे, किंवा नवराबायकोची मनें एकमेकांविषयीं कलुषित करून त्यांची ताटातूट केलेली आहे. नाही तर साधुसंतांचा छल केला असेल. कांहीं तरी घोर पातक माझ्या हातून घडल्याशिवाय परमेश्वराने माझी आणखी इकडची