पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. शिवाजी-तुह्माला कोणी इकडे पाठविलें रे? खरेच सांगा. माझ्याजवळ चोरलें तर खबरदार. गोप्या-सरकार, बाईसाब कायी आन खात न्हायिती. त्यांची तुह्माला दया येऊया. त्या कायी जगायच्या न्हायिती. त्यांच आपल्यापाशी अस मागन हाय की, एकदा या पायाच दर्शन देऊन आपल्या हातान एकदा माझ दोन तुकडे करून टाका. (रडत रडत ) असला निरुप सांगायलाबी आम्हाला रडु येत. गण्या-सरकार न्हायि तर ही घ्या कटार, आन् जर तुझी परत येत नसताल, तर आमची हिथच खांडुळी करून टाका. मंजी आम्हाला ही काळी त्वांड घेऊन बाईसायबाकडे जानबी नग. शिवाजी-अरे लुच्चांनो, तिने तुम्हाला पढवून पाठविले आहे नाहीरे ? चालते व्हा तुम्ही दोघे येथून. मी साफ घरी येत नाही. कारे, तिची आणि तुमची कोठें गांठ पडली ? गोप्या-त्या पल्याडल्या खिंडीत पडली. त्यानला आतां काय निरोप जाऊन सांगू. त्यानला हे त्वांड कस दावाव ? सरकार, आम्ही आपल्या बायका अशा सोडूनश्यान गेलो असतो तर सरकारानी आमची चामडी लोळवली असती. गण्या-पन आतां सरकारची चामडी कोन काढनार है. थोरानी खाल्ल म्हंजी औषधाला खाल्ल, आन् गरीबान खाल्ल म्हंजी भर केली पोटाची. शिवाजी-तुम्ही तिला असे सांगा की, मला तुझी गरज नाही. राज्य मिळविण्याची गरज नाही. प्रत्यक्ष मला माझ्या आईबापांची सुद्धा गरज नाही. आता तुम्ही म्हणतां की ती काही खात नाही, आणखी पाणीही पीत नाही, त्यास तिला असें सांगा की, तूं असे कडकडीत उपास काढू नको. अशा करण्याने माझें मन वळावयाचे नाही. ही माझ्या हातांतील आंगठी तिला द्या. हिच्यावर माझें नांव आहे. जोपावेतों माझी आणि तिची गांठ पडली नाही