पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. आन सरकारच्या पायापाशी इनती करतो की, सरकाराची कामगिरी बजाविली यांत बक्षीस काय म्हून मागायच ? गण्या-पायाप मागन इतकच हाय की, सरकारानी घरापोत चलाव. थोरल्या आईसाब रडत्याती, बाईसाब रडत्याती, रंगूबाई रडत्याती, गंगुबाई रडत्याती, तानाजीराव रडत्याती, पंडितराव रडत्याती. गोप्या-सरकार आपुन आम्हासनी शिकवित व्हता की, आइच ऐकाव म्हुनश्यान, आन् आता सरकारच आइच ऐकत न्हायिती. तवा सरकाराला आता काय शासन कराव ? आन कुनी कराव ? शिवाजी-काय लबाड आहेतरे हे ! गण्या, गोप्या, तुमचे बोलणे मला फार आवडते. गोप्या-आपुनबी आईला आन् बायकुला सोडुनश्यान सरकाराच्या पायाप हिथच डोंगरात राहणार. गण्या-सरकार घरी आल्याबिना आपुन घरी जानार नाही. घरी जाव तो इचेभन संमदी मानस रडत्याती. पागतली घोडी बी रडत्याती, चारा खात न्हायिती. गाई वासर हंबरत्याती चारा खात न्हायीति. त्यांच्या डोळ्यामंदुन पान्याच्या धारा लागत्याती. पाखर सुद्धा सरकार चोचीत चारा घेऊनश्यान उगच बसत्याती. वाड्यामंदी संमद भयान दिसतया. अंधार झालाया. आपुन आल्याबिगर उजेड पडायचा न्हायी. शिवाजी-तुम्हांला कोणी पढवून पाठविले आहे कायरे ? अगदी शिकविल्यासारखं बोलतां तें ? तुमच्या भाषणाने माया मनाला मोह उत्पन्न होतो; पण हे कांहीं बरोबर नाहीं तीर येथून चालते व्हा. गोप्या-सरकार आम्हा गरीबावर अस कश्यापायी रागावता ? गण्या-माबाप. आई जर तान्ह्या लेकराला सोडश्यान ग्येली तर ते लेकरू कस जगल ! राजा जर आपल्या लोकाला मोहन श्यान गेला तर त्या लोकाला कुनीबी लुटूनश्यान नेईल. समया लोकाच नाक राजा हाये.