पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. ७९ शिवाजी-फळे आंबट आहेत कारे ? अरे, ह्या फळांचे असे दातांनी तुकडे कोणी तोडले आहेतरे ? ह्याला का पांखरांनी चोंच्या मारल्या आहेत कायरे ? गण्या-सरकार चिमनीच्या दातान थोडी थोडी कुरतडल्याती. हंग ही अस्सी कुरतडली (फळाचा तुकडा तोडून दाखवितो.) म्या काय उष्ट न्हायी केल. झटल सरकारासनी खायची, तवा आंबाट हायती, का कडु हायती, का तुरट हायती, का ग्वाड हायती ? आपल्या पायाच्यान म्या काय उष्टी न्हायी ती केली. शिवाजी-( हांसतो.) हा मूर्खा ! उष्टी नाही केली तर काय ? थोडी थोडी खाऊन पाहिली होय ? आतां ह्याचा देवाला नैवेद्य कसा दाखवावा ? गोप्या-सरकार तुमच्या निवेदाला आनल्यातीन् देवाच्या बाच हिथ काय? शिवाजी-गाढवा असें ह्मणूं नये. ( गोप्या तोंडात मारून घेतो.) रामांनी भिल्लिणीची उष्टींच बोरे खाल्ली होती. श्रीरुष्ण परमात्म्यानी गवळ्यांच्या पोरांच्या तोंडांतल्या ताकाच्या गुळण्या फार गोड लागतात ह्मणून आपल्या तोंडांत घेतल्या. मी जातीचा मराठा आणि ही माझ्यावर भाव ठेवणारी मुलें जातिवंत मराठ्यांचीच आहेत. मी यांची उष्टी फळे खाणार. फार तर काय, पण मी जर ब्राह्मण असतो, आणि मला कोणी एखाद्या कुणब्याने सद्भावाने असली देणगी आणून दिली असती तरी सुद्धां मी खाल्ली असती. ( फळे खाऊ लागतो.) अहाहा! ही फळें अमृतासारखी गोड आहेत ! यांच्या पुढे पक्वान्नें रद्द आहेत. उघडच आहे की, पक्वान्ने मनुष्यांनी केलेली असतात, फळे आणि फुलें ईश्वरनिर्मित असतात. तुझांला या वेळी बक्षीस काय देऊ रे ? (दोघे सरकारच्या पायां पडतात.) अरे, काय पाहिजे ते मागा. गोप्या-देवाला निवेद दावला झंजी मग देवाच्या पाया पडाव लागत की न्हायी ? तस आह्मी सरकाराच्या आता पाया पडतो.