पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० श्रीतुकाराम. नाहीं बाम्ह तिने लाग न्हायी इचेभन. ( लांब पाहिलेसे करून) पन गड्या, त्या पल्याडल्या डोंगरावर झाडाखाली कोन बसलयारे ! गण्या-अहारे माझ्या नशीबा ! हे तर आमच सरकार ! कसल वंगाळ कपड अंगावर घातलेती ! गोप्या-अक्षी मी तर वळखले सुधा नाई. मण्या-त्वांड लई सुकुनश्येनी गेलया. गोप्या-डोळ मिटूनश्यान बगळ्यागत बसलेती. गण्या-झ्वाप घेत्याती मला वाटत. गोप्या-सरकार, सरकार, मायबाप, मायबापगण्या-धनीसाब, आनदाता, (शिवाजी डोळे उघडतो.) शिवाजी-गोप्या ! गण्या ! अरे तुझीरे कोणीकडे हिकडे ! गोप्या-सरकार तुमचा सबुद लई ख्वाल गेलाया. गण्या-तुह्माला लई भूक लागलीया. (शिवाजीच्या गळ्यांत फुलांचे हार घालतात व फळे पुढे ठेवितात.) गोप्या-सरकार आमची गरीबाची पुंजा. सरकारांनी मानुनश्यानी घ्यावी. दुरपतीबाईच एक भाजीच पान कृष्णादेवाला आवडल तस आह्मी आणलेली फळ सरकाराला ग्वाड लागुंदे देवा. गण्या-सरकार अदुगर ही फळ खा, मंग आम्हासंग ब्वोला. शिवाजी-काय चमत्कार आहे ! या जगांत देव कोणालाही उपाशी ठेवीत नाही. एक त्याच्यावर विश्वास असला ह्मणजे बस्स. तो आपला योगक्षेम चालवितो. माझी बालंबाल खात्री झाली. मी भुकेने अगदी व्याकूळ झालो होतो, इतक्यांत देवाने मला ही फळे पाठवून दिली ! गोप्या-सरकार देवान कशाची म्या आनल्याती. .गण्या-त्यातली निम्मी म्या आनल्यात. माझ्या पायामंदी काट मोडल्याती. गोप्या-सरकार मनत्याती देवान आनल्याती, पन देव तर इचेभन आपल्या देव्हाऱ्यामंदी बसल्याती. ALAN