पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. राहणे कठीण. मिष्टान्न नाही तर भाजीभाकर, भाजीभाकर नाही तर फळेमुळे, फळेमुळे नाही तर वनस्पतीचा पाला उकड्रन ह्मणा, नाही तर कच्चा खाऊन या वीतभर पोटाची खांच भरलीच पाहिजे. तुकोबाचे कीर्तनाला रोज जातो. त्यांचे तरी नेहमी ह्मणणे काय असते. “पोटासाठींगा झालों पांगिला जना" “पोट लागलें पाठीशी हिंडवितें देशोदेशी” हे सर्व खरे. पण मी ह्मणतों या पोटाला रोज अच्छेर अन्न असले झणजे बस्स आहे. पण आह्मी पहा स्वताचे चैनीकरितां, स्वताचे ऐषआरामांकरितां, आणखी स्वताच्या इच्छा तृप्त करण्याकरितां दुसऱ्याचा छळ करून लाखों रुपयांचा फना उडवतो. वास्तविक ज्याची गरज नाही. अशा शेंकडों गोष्टींची महत्वाकांक्षा उत्पन्न होऊन आपल्या जीवाला व्यर्थ कष्ट देणे यासारखा मूर्खपणा कोणताच नाही. (डोळे मिटून बसतो.) ... (गण्या व गोप्या फळे घेऊन प्रवेश करितात.) ) गोप्या-भर्र, भर, वारा काय वाहतोया ? गण्या-गडगडगड गड, आभाळामंदी म्हातारी हरभर भरडतीया ? गोप्या-आक्षी मामांजी तुम्ही पळापळा आन् मी येते सळा सळा. अक्षी चळकावर चळका येत्याती. गण्या-आज पाऊस बी लई पडतोया. - गोप्या-पावसांत भिजूनश्यानी थंडीन लई काकडुन गेलोया. गण्या-देवा आता सरकारची आन् आमची कसी तरी एकदा गाठ पहुंदे गोप्या-संमदा डोंगर हिंडलो पन सरकार कुठ गवसत नाहीत. गण्या-रानामंदी कशी नामी नामी फळ गवसलेती, आन् फुलबी गवसलेती. ह्मटल सरकारांची पुंजा करू फुलान. गोप्या-आन् ह्या फळाचा सरकाराला निवेद दाऊं. गप्या-पन सरकार कुठबी गवसत नाहीत. गोप्या-सरकार गवसल न्हायी तर आपुन हा पराण ठिवनार