पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. लाग का गोप्या-आपुन बी राव तकडच जानार. गण्या-मला आन ग्वाड लागत नाही. गोप्या-मला बी लागत नाही. गण्या-मला पानी बी ग्वाड लागत नाहीं ! गोप्या-मला बी लागत नाही. गण्या-मला इवाप येत नाही. गोप्या-मला बी येत नाही. गण्या-सरकार आन बाईसाब माझ मायबाप हायेती. गोप्या- माजबी हायेती. मण्या-मग आई जर आपल्या तान्ह्या लेकराला सोडुनशान गेली, तर मंग ते मरून न्हायीका जानार ! गोप्या-आन डोंगरांत जाऊन सरकारच्या पायावर डोक ठेवनार. गण्या-आन् सरकाराला घरी घेऊन येनार. गोप्या-मंग में व्हनार असल तें व्हईल., गण्या-चला आपुन डोंगरांत जाऊं. (जातात. अरण्याचा पडदा पडतो. शिवाजी जप करीत बसला आहे.) शिवाजी-कालपासून खायला कांहींच मिळाले नाही. भुकेच्या तीव्र यातना कशा असतात हे मला आज चांगले समजले. या पोटाने सर्व जग व्यापले आहे. दुसऱ्याची चाकरी करावयाची पोटासाठी, दुसरा खेटरें मारीत असला तरी पोट हांजी हांजी करावयाला लावतें. लबाड बोलावयाचें पोटासाठी. चोरी चहाडी करावयाची पोटासाठी. दुसऱ्याचे जीव घ्यावयाचे पोटासाठी. हर हर ! देवा हे पोट साधुसंताला आडवतें मटले तरी चालेल. नसत्या विवेकानें पोट भरत नाही. दोनप्रहरची वेळ होऊन जठराग्नि एकदां प्रदीप्त झाला ह्मणजे विवेक सुचत नाहीं, वैराग्य सुचत नाही, ज्ञान सुचत नाही, आणखी भक्ती सुचत नाही. विवेकानें कामक्रोध आवरण्याचे सोपें, पण अन्नपाण्यावांचून