पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक चवथा. प्रवेश १ ला. स्थळ-पुणे येथील शिवाजीमहाराजांचे वाड्यासमोरील पटांगण. ( गोप्या व गण्या हांसत व उड्या मारीत प्रवेश करितात.) गोप्या-लई मजा होती राव इचेभन. गण्या-बसायला घोडा! गोप्या-पायामंदी ऐटदार तोडा! गण्या-पाठीला ढाल ! गोप्या-कंबरला तलवार ! गण्या-गळ्यामंदी मोत्यांचा हार ! गोप्या-डोईला मंदील भरजार ! गण्या-आन बायकाबी सरकारान दिल्या गुलजार ! लई गम्मत व्हती इचेभन ! गोप्या-या गोप्याच्या नशीबाबराबर कुनाचबी नशीब नव्हत ! गण्या-कस गडी मर्दावानी दिसत व्हत. गोप्या-सरकारच लइ लाडक, म्हुनशान संमद लोक हंग अस्स राम राम करीत व्हत ! गण्या-ते संमद खर, पन दादा सरकार गेल्यापुन अक्षी वंगाळ झालया. कुनालाबी चैन नाहीं बगा ! थोरल्या आईसाब बी तकडच, बाईसाब बी तकडच, रंगुबाई तकडच, गंगुबाई तकडच, तानाजीराव तकडच, पंडितराव तकडच, आन सरकारबी तकडच. गोप्या-मंग आपुन तरी हकड कशाला हाव, आपुनबी जाव तकडच. गण्या-पन सरकार डोंगरांत गेल्याती.