पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० नाहीं ब्राम्ह तिने लाग HERE ७४ श्रीतुकाराम. म मंबाजी-अहाहा ! तूं प्रत्यक्ष धन्वंतरी आहेस. तुझ्या हाताचा स्पर्श या माझ्या शरीरास झाल्याबरोबर माझ्या अंगांतील सर्व कळा नष्ट झाल्या. मला परम सुख वाटते आहे. आजपावेतों तुझा मी विनाकारण छळ केला, त्याचे प्रायश्चित्त परमेश्वराने मला दिले. तुझ्यासारखा सत्पुरुष माझ्या संगतीला असून मी व्यर्थ दिवस घालविले. मला आतां शिष्यशाखा नको. कांहीं नको. तुझ्याबरोबर आळंटीपंढरीच्या वाऱ्या करून सुखाने दिवस घालवीन. (शिण्यास उद्देशून ) अरे मुलांनो, तुम्ही आपापल्या घरी स्वस्थ निघून जा. कोल्हभट-म्हटले बुवांची गादी आपण काही दिवस चालवू; परंतु बोवांनी गादीच काढून टाकिली. असो; भटभट, चला हे फराळाचें घेऊन नदीवर. तेथें खाऊन पाणी पिऊन घटकाभर विश्रांति तरी घेऊ. ( जातात.) मंबाजी-तुकारामा, मी तुला इतकें मारले असून तूंच होऊन माझ्या समाचारास आलास, माझ्याशी गोड गोड बोलतोस, माझें अंग ठणकतें म्हणून तुला वाईट वाटून तूं चेपतोस, माझें सर्वस्वी समाधान करितोस. ही तुझी साधुवृत्ति पाहून तूं मला प्रत्यक्ष देव वाटतोस. सुंदराजीला पाठवून मीच तुझें सत्व हरण करण्याचा प्रयत्न केला. पण मला यश आले नाही. तुझ्या उपदेशाने सुंदराजीची वृत्ति पालटून उलट तीच मला उपदेश करूं लागली. कामक्रोधाला तूं बंदीखान्यांत टाकले आहेस. आह्मी इंद्रियांनी दीन केलेले असून तूं त्यांचा घनी आहेस. तूं त्यांना आपल्या ताब्यांत ठेविलें आहेस, तस्मात् तुझ्यासारखा पुरुष त्रिभुवनांत नसेल. तुकाराम-माझी स्तुति बिनाकारण करूं नका. मी अत्यंत मूढ माहें तमास आतां बरें वाटत असल्यास कीर्तनास उभे रहा. मी तुमचे ध्रुपद धरितों. मंबाजी-फार उत्तम. माझी प्रकृति आतां उत्तम झाली आहे.. का । उभयतां मित्रांप्रमाणे गळ्यास मिठी मारून जातात.) तिसरा अंक समाप्त. wins