पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. ज्ञानाचे बीजारोपण शिवाजीचे हृदयसंपुटांत इतकें खोल रुजले गेले होते की, यावज्जीव त्याच्या हातून अयोग्य कृत्य काहीच घडून आले नाही. अशा पुण्य पुरुषास अवतारी म्हणावयास काय हरकत आहे ? श्री तुकाराममहाराजांनी क्षात्रधर्माचा उपदेश करून जर शिवाजीला संसारांत घातले नसते तर हिंदुपद पादशाहीची टोलेजंग इमारत उमारली गेली असती काय ? महाराष्ट्र देशाच्या इतिहासांत केवढा फरक पडला असता बरें ? आणि आपल्यास प्रस्तुत कोल्हापर येथील महाराजांच्या वंशवृक्षाच्या मधूर सुवासिक पुष्पांचा तरी परिमल घेण्यास सांपडला असता काय ? असो. रामेश्वरभट, मंबाजी गोसावी, दोन्ही संन्यासी इत्यादि पात्रांची योजना महिपतीच्या वाक्याला धरूनच केलेली आहे, तथापि महिपतीचे ग्रंथांत विषयसुखाचे प्राप्तीकरितां एक स्त्री तुकारामावर आसक्त होऊन त्याच्याकडे गेली होती असे आहे, या स्त्रीचे ऐवजी नाटकास विशेष उठावणी यावी म्हणून आम्ही सुंदराजी या पात्राची योजना केलेली आहे. अभंग. अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥१॥ गिळुनि सांडिले कलिवर । भवभ्रमाचा आकार ॥ २ ॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥३॥ तुका ह्मणे आतां । उरलों उपकारापुरता ॥४॥ असें जो स्वतःस म्हणतो तो सदेह वैकुंठास गेला नसेल असे कोणी म्हणावें ! ग्रंथकाराचा जरी या गोष्टीवर सर्वथैव भरंवसा आहे, तथापि अर्वाचीन तत्त्ववेत्यांच्या शोधांप्रमाणे ज्याला जसे वाटेल तसे त्याने समजावें. वैकुंठास सदेह गेल्याबद्दल आपल्याजवळ खाली लिहिल्याप्रमाणे दाखला सांपडतो. रामेश्वरभटानें समक्ष पाहिलेली गोष्ट तो लिहितो. अभंग. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी। सरी न पावती तुकयाची॥२॥ शास्त्रेही पुराणे गीता नित्यनेम ।वाचितांतें वर्म न कळे तया॥२॥