पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. तुकारामाकडे जाऊन तिने विनविल्यावरून त्याने शिवाजीस क्षत्रियांच्या धर्मावर व्याख्यान देऊन पुनः ताळ्यावर आणला."। 3 महिपाने केलेले तुकारामाचें चरित्र. वरील गोष्टीस अनुसरून प्रस्तुतच्या नाटकाची रचना केलेली आहे, तथापि यास मुख्यत्वे आधार महिपतीच्या तुकारामाच्या चरित्राचाच घेतला आहे. तुकारामबोवा हे इ. स. १६५० त वैकुंठवासी झाले, त्या वेळेस शिवाजीचे वय २२।२३ वर्षांचे होते. म्हणजे शिवाजी केवळ अल्पवयी होता म्हटले तरी चालेल. श्रीरामदास यांनी शिवाजीस तारीख १२ एप्रिल सन १६४९ ईसवी रोजी उपदेश केला. याच्यापूर्वीच जर तकारामाचा उपदेश झाला असेल तर शिवाजी ह्मणजे केवळ बालशिवाजी, ज्याचे वय केवळ २०।२१ वर्षांचें, असाच होता. शिवाजीची योग्यता स्वयंसिद्ध आहे. शिवाजीचे वर्तन न्यायाचें, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणतेचे व परधर्मसहिष्णतेचे होते. दोन चारशें लढाया मारून त्यांत विजयी होणे; तीन चारशें किले मैदानांत, डोंगरावर व समुद्रतीरावर बांधणे; नवीत सेन्य तयार करणे; नवीन आरमार निर्मिणे; नवे कायदे करणे, स्वभाषेला उत्तेजन देणे. स्वतः पद्यरचना करणे; सारांश स्वदेशाला सुखी करणे; ह्या लोकोत्तर त्यांनी जर कोण्या पुरुषाने ह्या भूमंडलाला अक्षयी ऋणी करून ठेवले असेल तर ते शिवाजीनेच होय. शिवाजीची खासगी वर्तणूक व सार्वजनिक पराक्रम इतके लोकोत्तर होते की, त्याच्याशी तुलना करावयास जी जी म्हणून व्यक्ति घ्यावी ती ती या नाही त्या गणाने, शिवाजीहून कमतरच दिसेल. ह्या अवतारी परुषाविषयी लिहितां लिहितां समर्थ म्हणतात 'तयाचे गुण महत्वासी तलना केची ! यशवंत, कातिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत नीति जाणता. आचारशील, विचारशील, दानशील, कर्मशील, सर्वज्ञ, मुशील, धर्ममूर्ति, निश्चयाचा महामेरू, अखंड, निर्धारि, राजयोगी' पीनानाप्रकारची विशेषणे रामदासांनी शिवाजीला लाविली आहेत." मराठ्यांच्या इतिहासाची साधनें. एवढी योग्यता शिवाजीचे अंगी येण्यास आह्मांस असे वाटते की, श्री तकाराम आणि श्री रामदासच कारणीभूत आहेत. अध्यात्म