पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना, मागें कवीश्वर झाले थोरथोर । कोणे कलेवर नेलें सांगा ॥३॥ ह्मणे रामेश्वर सकळिका पुसोनी। गेला तो विमानी बैसोनिया४ महिपती लिहितोः ओव्या. तव पुरंदरासहित सुर । नामघोषं गर्जती थोर ॥ पुष्पक प्रकाशें कोंदले अंबर । तेजें दिनकर उणा दिसे ॥१॥ तुकया समागमें होते जन । प्रकाशे त्यांचे झांकले नयन ॥ जैसी गगनीं दिसे सौदामिन । तेव्हां झांकती नयन सर्वांचे॥ तेवीं विमानाच्या प्रकाशें निश्चिती।सकळांची लागली नेत्रपाती तेव्हां तुका बैसोनि विमानाप्रती । वैकुंठाप्रती चालिला ॥३॥ भाविक प्रेमळ वैष्णवसंत । तयांसी निराळपंथ दिसत ॥ घंटानाद कोंदला गगनांत । गंधर्व गात नामघोर्षे ॥४॥ पुष्पक प्रकाश होतांचि दूर । लोक उघडोनि पाहती नेत्र ॥ तों तुका न दिसे क्षितीवर । तेव्हां शोक फार मग करिती॥५॥ आया. श्रीराम तसा गेला वैकुंठाला सकाय हा कांहीं ॥ महिमा न भिरु करणे दुष्टांच्या यास काय हा कांहीं॥१॥ मोरोपंत. परंधाम टाकूनि कैसा उडाला।जिवन्मुक्त होऊनि ब्रह्मीं बुडाला जयाची तनु ब्रह्मरूपी बुडाली।भवभ्रांति हे जाण कैसी गळाली? वामन. निळोबाराय याची तुकारामाच्या शिष्यवर्गात पट्टशिष्यांत गणना आहे. त्याने केलेल्या आरतीत तो म्हणतो: प्रयाणकाळी देवें विमान पाठविलें । कलिच्या काळामाजि अद्भुत वर्तविलें ॥ मानवदेह घेउनि निजधामा गेले । निळा ह्मणे सकळा संतां तोषविलें ॥१॥ याशिवाय कचेश्वर, विठ्ठलनाथ, शिवदिन केसरी, गोपाळबोवा, ( तुकारामाचा नातु) इत्यादिकांचे म्हणणे तुकाराम सदेह वैकंठास गेला असेंच आहे. असो.