पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. ७३ बुडविल्यास नाही का? माझ्या नवऱ्याचा हात कलम करणार होतास नाही का? त्यांनी अभंग केले ह्मणून तुझ्या बापाचे काय गेलें ! ह्मणे त्यांत श्रुतीचे अर्थ उमटतात. तुझ्या बापाने कधी श्रुति पाठ केली होती काय ? ह्मण पाहूं वेदांतली एखादी ऋचा. (मंबाजीचे डोके हालविते व उभयतां शिष्यांस उद्देशून ह्मणते.)कायरे भटुरड्यांनों, तो मंबाजी मरतो आहे, आणखी तुम्ही इकडे फराळावर हात मारतां काय? पुनः माझे नवऱ्याचे वाटेस जाशील का? (मंबाजीचे कान उपटते.) मारूं का श्रीमुखांत. (दोन चार गुह्ये पाठीत मारते, शिष्य सोडविण्यास जातात त्यांसही मारते.) ब्राह्मण कशाला झालास तुला जर वेदाचें एक अक्षरही येत नाहीं तर? ठोंब्या मेला ! कोल्हभट-तुम्हाला तुकारामाने मंबाजीबोवाचा समाचार घेण्यास मुद्दाम पाठविलें आहे असे दिसते. जिजाई-नुसता मंबाजीचाच काय पण तुमचाही समाचार घेतें. (त्यांस मारावयास धांवते. ते इकडे तिकडे लपून बसतात. इतक्यांत तुकाराम आला असें पाहून पळून जाते.) मंबाजी-तुकाराम, तुला हा मंबाजी अनन्यभावानें शरण आहे. मी अत्यंत अपराधी आहे, तुझा मी जो विनाकारण छळ केला, त्याचा मोबदला मला यथायोग्य मिळत आहे. (उभयतां एकमेकांचे पायां पडतात. तुकाराम मंबाजीचे पाय रगडतो, त्यास मंबाजी प्रतीकार करतो.) तुकाराम-बोवासाहेब, मीच तुमचा अपराधी आहे. मी विनाकारण तुमचा भोपळीचा वेल दुखविला, नाही तर मला मार मिळाला नसता. शिवाय मी मटले की, देवाचे काम करण्यास मी कोणाच्या बापास भिणार नाही, त्यामुळे तुह्माला वाटले की याने माझाच बाप काढला, आणि संतापाने मला तुझी मारले, यामुळे तुह्माला फार श्रम झाले! मोठी तसदी पडली ! अस्तु. तुमच्या सर्वांगास आतां कळा लागल्या आहेत हे पाहून मला फार वाईट वाटत आहे. मी जरा तुमचे पाय चेपतों, मणजे तुह्मांला आराम वाटेल.