पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० नाहीं ब्राम्ह तिने लाग EF F श्रीतुकाराम. कोल्हंभद-काय व्हावयाचे आहे ? बुवा लागले आहेत आता पंथाला; पण गादीवर आतां कोणाला नेमावयाचें तें आतां कांहींच ठरवीत नाहीत. तुला की मला ? भटभट-मला फार रडू येते. ( रडत रडत ह्मणतो.) बुवासारखें मनुष्य पुनः दिसणार नाही. कोल्हभट-बुवा का फार सुंदर होते होय! पण अजून काही बुवा वारले नाहीत, तो इतका चौपदरी गळा काढून रडूं नकोस. भटभट-तुझें नांवच कोल्हंभट, कोल्ह्याची जात लुच्ची असते ह्मणतात तें कांहीं खोटें नाहीं. कोल्हभट-कोल्ह्यापेक्षां मनुष्याची जात लबाड असते. सर्व जातींत ब्राह्मण लबाड, सर्व ब्राह्मणांत भट लबाड ह्मणजे हुशार आणखी त्या भटांचे तुम्ही भट, ह्मणून तुमचें नांव भटभट. नेहमी अंबट खाणारे. ( तुकारामाची बायको प्रवेश करिते.) जिजाई-का मंबाजीबुवा, आतां कसे काय वाटते ? माझ्या नवन्याला मारतांना कांहीं तुमचे हात दुखले नसतील बहुतकरून! या हातावरचे झाडे या हातावर येण्याला उशीर लागत नाही. समजलांत? करावे तसे भरावे. त्यांनी तुझा अपराध तरी केला होता काय? अजून तुझी रग चांगली जिरली नाही, अजून जिरावयाची आहे. सुंदराजीला माझ्या नवऱ्याला नादी लावण्याकरितां तूंच पाठविले होतेस नाही का? पुढे तिने तुझी फजिती केली. तूं तिचे पायां पडलास. आम्हांला सर्व कळलें. असाच का तं बुवा ? असेच का तुम्ही संत! मग माळा कशाला घालतां शेण खायला ? पंजाजी-या सर्व अपराधांचे आतां मला चांगले प्रायश्चित्त मिळाले. आतां माझे मनांत तुकारामाच्या सद्गुणांचा चांगला प्रकाश पडला. परमेश्वराने माझ्या अपराधांबद्दल मला योग्य प्रायश्चित्त दिले. जिजाई-अभंगांच्या वह्या रामेश्वरभटाला सांगून तूंच पाण्यांत ER____ny