पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. प्रवेश ४ था. स्थळ मंबाजीचे घर. (मंबाजी कण्हत अंथरुणावर पडला आहे; एकदोन शिष्य - जवळ बसले आहेत.) मंबाजी-मेलों! मेलों !! मेलों !!! काय या माझ्या अंगाला कळा लागल्या आहेत! अग बया, बया, बया! आतां मी काय करूं! अरे तुकारामा! तुझा मी मोठा अपराध केला ! तुला मी विनाकारण मारले ! तुझा विनाकारण छळ केला ! देवाने मला योग्य शिक्षा केली! आतां कांहीं मी जगत नाही. आतां मरतों! एकदम प्राण जातील तर बरें! या यातना आतां सहन करवत नाहीत. सगळे माझें अंग दगडाप्रमाणे बधिर होत चाललें आहे! सगळ्या अंगांतून शिलका निघत आहेत! नारायणा! आतां तुकारामाचे पाय माझ्या कशाने दृष्टीस पडतील! त्याला शरण गेल्याशिवाय या माझ्या शरीरांतील वेदना नाहीशा होणार नाहीत! तुकाराम महा वैष्णव ! मोठा संत! मी पापी ! दुराचारी! अधम ! चांडाळ! माझ्यासारखा दुष्ट मनुष्य सान्या त्रिभुवनांत सांपडणार नाहीं! जन्मापासून दुष्कर्मे करीत आलों! सत्य आचरण स्वप्नांत सुद्धा माहीत नाहीं! नेहमी विषयावर चित्त, कधीं परोपकार ठाऊक नाही! ( एक शिष्य ताटांतील फराळाचे खातो.) भटभट-कायरे कोल्हंभट, बुवांचें फराळाचे खातोस काय ? बुवा आजारी पडले आहेत, नाहीतर सांगितले असते कसे कायतें. कोल्हंभट-भटभट, तूं अगदीच मूर्ख आहेस. बुवा आजारी पडले आहेत तो बुवाकरितां आणलेले मिष्ट मिष्ट पदार्थ खाऊन आपण पुष्ट व्हावें. मग बुवासारखे गलेलठ बनलों की पुढे बुवाचे दुष्ट वरदान चालवायला आपलें ठीक. भटभट-दांडगेश्वर आहेस. ते असो; पण कायरे, आतां बुवांचे कसे काय होईल?