पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- श्रीतुकाराम. - जिजाई-माझें सगळे ऐकून घ्या. मग मला आठवण रहात नाही. दम खा जरा माझेच कीर्तन ऐका अगोदर. कोणी एक मेली ब्राम्हणाची म्हातारी बाई आली, तिचें तेल बाजारांतून आणलेत. तिने गांवांत पिकविले की, या वेड्याचा हात एकदा भांड्याला लागला म्हणजे भांड्यांतले तेल संपतच नाही. बरें जर असें असते तर मग आमच्या घरचे धान्य का संपतें ? तेलाप्रमाणे धान्य कां नाहीं वाढत ? गांवांतल्या सगळ्या गाडीवानांनी या पिशाच्चाच्या गळ्यांत तेलाचे नळे अडकवले. चांगले एका बैलाचे ओझें दिले, आणखी दिला गांवांत पिटाळून तेल आणावयाला. त्यांत मेला तो मंबाजी बोकड सुद्धा होता. इथल्या लोकांनी माझ्या नवऱ्याला अगदी वेडा करून टाकला आहे. माझा नवरा, त्यांची कामे करून एकदां मेला ह्मणजे सगळ्यांना संतोष होईल. तुकाराम-चल महादेव, हे येरंडाचे गु-हाळ लवकर आटपणार नाही. जिजाई-गुरासारखें धोपटले असून तुमच्या अंगावरचे वळसुद्धां जिरले नाहीत, आणखी पुनः बेशरमासारखे त्याच्या समाचाराला जातां ! मला तुमचा कसा संताप संताप येतो ! (तुकाराम हांसतो.) पण तुमचा संताप अगदीच जळालेला. मंबाजीनें मारल्याबद्दल तुम्हांला त्याचा मूड नाहीं का उगवायचा? तुकाराम-संतापाचे झाड जळून गेले. तुझ्याच तोंडाने न्याय झाला. मग आतां सूडाची फळे कोठून येणार ? (जिजाईचा हात धरून) चल आपण मंबाजीच्या समाचारास जा जिजाई-चला व्हा घरी. मंबाजी जाईना का तिकडे उलथून. (जिजाई तुकारामास घराकडे ओढते. तुकाराम, महादेव व काशी एकीकडे ओढतात. पडदा पडतो.)