पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३रा. या तरुण लाजाळु मुलीप्रमाणे लाजून दूर पळत असते. संपत्तीचा नाद सोडला तर ती आपण होऊन गळ्यांत पडते लक्ष्मीची आशा केली की ती कधीही मिळावयाची नाही. तिच्याविषयी निराशा असली की, तिच्या ठेचा लागावयाच्या. महादेव-चला आपण मंबाजीच्या समाचारास जाऊं.कीर्तनाची वेळ भरत आली. जिजाई-तुम्हाला लौकिकाची काही लाज आहे का? हो, बरी आठवण झाली. लोक कीर्तनाला गेले ह्मणजे त्यांचे जोडे संभाळीत असतां ! कीर्तनांत मशाल धरून उभे रहातां ! कोणी थकला भागला वाटसरू वाटेत भेटला की त्याचे ओझें आपल्या डोक्यावर घेतां ? आपल्या घरांत अन्नान्नदशा, पण त्या वाटसराला आपल्या घरी घेऊन येतां, कारण तो पंढरीला जावयाचा. चालून चालून त्याचे पाय दुखू लागले तर रगडीत बसतां. ऊन्ह ऊन्ह पाण्याने त्याचे पाय शेकीत बसतां. गाय बैल रस्त्यांत भेटलीं की त्यांना कुरवाळतां. मुंग्याचे बिळांतून तूप, साखर, मैदा एकत्र करून घालतां. आणखी गाढवाला सुद्धा पाणी पाजतां. चिंचवडकर मोरया गोसाव्याच्या घरी गेलांत. विठोबा आणि गणपती तमचे पंक्तीला गिळायला आले असें सारे जग म्हणत आहे. लोकांना बेधडक तुझी सांगतां की विठोबान् गणोबा एकच. (मोठ्याने ओरडून) गणोबाला सोंड असते सोंड ! आणि विठोबाला तोंड असते तोंड ! विठोबा काळा! आणि गणोबा तांबडा ! ढेरपोट्या ! मोदकांचा काळ ! म्हणे दोन्ही देव एकच. दिवे ओवाळा दिवे ! तुमचा लौकिक अगदीं जात चालला. तुकाराम-आम्ही लौकिकाचे गाठोडे कधीच झुगारून दिले आहे. गाढव जर ऊन्हांत तडफडून पाण्यावांचून मरत असले तर त्याला पाणी पाजूं नये की काय ? आपल्या जीवांत आणखी त्याच्या जीवांत काय फेर आहे ? तुझ्या बडबडीचा आम्हांला कंटाळा आला. महादेव, काशे, चला आपण कीर्तनाला जाऊं.