पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. मारतांना कांही कसूर केली का ? मरूं या त्या मांगाला. तो मेला ह्मणजे मी खडीसाखर वाटणार आहे. ते असूं द्या. पण कर्जरोखे आणि गहाणखतें कोठे आहेत ? तुकाराम-समुद्रास्तृप्यन्तु केव्हांच झालीं ! आपल्याला खतापत्रांचा व सोन्यानाण्यांचा विटाळ हवा कशाला ? जितके म्हणून ह्या खतापत्रांच्या जाळ्यांत गुंतले ते परमेश्वराला मुकले. त्यांच्या हाती अखेर भुसाचे लाडू आले. जिजाई-तुम्हांला पैशाची गरज नाही, पण आम्हांला आहेना! मिरच्यांचा व्यापार करण्याकरितां कोंकणाला गेलांत. मेलं तीन गोण्या मिरच्या बैलावर भरून दिल्या. पण पळस कोंकणाला गेला तरी त्याला तीनच पाने. मिरच्या विकल्या. कोण मेला विठुजी चाकर मिळाला होता त्याने पैसे वसूल करून दिले. पुढे पैसे तरी नीट संभाळून आणावयाचे की नाही ? वाटेत एक मंबाजीसारखा लुच्चा भेटला, त्याने सोन्याचा मुलामा दिलेली पितळेची कडीं देऊन तेवढे पैसे उपटले. आपण आले घरीं नारळाची आई घेऊन! पुनः मी जामीन होऊन माझे भाऊ श्रीमंत आहेत ह्मणून मी आपल्या हिमतीवर दोनशे रुपये कर्ज काढून दिले. महाडाला व्यापारासाठी पाठविले. कोण मेला ब्राम्हण खंडोबाचे माले मागत आला, त्याच्या गळ्यांत लांकडाचा नांगर अडकवलेला पाहिला. कटंबासहित भीक मागत होता. फार झाले तर चवलपावला देतें माणूस. तुझी सगळे पैसे त्याला देऊन टाकलेत. त्याला जाचांतन सोडविलात. तुमची अक्कल जात चालली. धनाजी पाटलाने तह्माला पाखरे राखण्याकरितां शेतावार राखणदार म्हणून ठेविलें. पण तुमच्या अकलेचे इतके तारे तुटले की, खरोखरच शेत पांखरांना खायला घालून तुम्ही पाखरे मात्र राखिलीत, मरूं दिली नाहीत ! आहांत की नाहीं अकलेचे खंदक. तुकाराम-या रडकथेची मला ओकारी आली. नेहमी पैसे । पैसे ! ! जो जो आपण संपत्तीच्या नादी लागतों तो तो ती एका