पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. नाहीत. ( तसें करितो. ) रामेश्वरभटाची आज्ञा हीच पांडुरंगाची आज्ञा. वेदावर अभंग केले, श्रुतीवर केले, संहितेवर बारा हजार,. निरुक्त, निघंट, ब्रह्मसूत्र इत्यादिकांवर अभंग केले, भक्तीवर एक कोट अभंग केला, एक कोटी ज्ञानावर केला, पंचाहत्तर लक्ष वैरा-- ग्याचे वर्णन केले, तितकीच नामाची स्तुति केली, साठ लक्ष अभंगांनी जनास उपदेश केला, परमेश्वराचे स्वरूपाचे वर्णन तित-- क्याच अभंगांनीं केलें, आणखी आत्मानुभव एक कोट वर्णन केला. एकंदर पांच कोट एकावन लक्ष अभंगांच्या या वह्या आज स्वसंतोषानें कृष्णार्पण करितो. ( वह्या नदीत टाकतो.) (महादेव व काशी प्रवेश करितात.) महादेव-(घाबचा घाबन्या) बाबा, बाबा, मंबाजीबुवाची प्र-- कृति फार हैराण आहे. काशी-अगदी तरवणी सुद्धां घोटत नाही. असे ती आपली शेजारची ठमाबाई सांगत होती. महादेव-त्यांच्या सर्व अंगास गळवाप्रमाणे ठणका लागला आहे असें ह्मणतात. तुकाराम-मग आज त्यांच्या कीर्तनाचे कसे होणार ? काशी-अंथरुणावर उठून बसावयाची त्यांना पंचाईत.मानेखाली हात घालून उठवून बसवावे लागते. कीर्तन कशाचे आले आहे ? महादेव-पण बाबा, त्याला एकाएकी असे होण्याचे कारण काय असेल बरे? तुकाराम-मनुष्याचा काय नेम आहे. आतां आहे आणि घटकेने नाही. हे जीवित अत्यंत क्षणभंगुर आहे. माशी जशी सहज उडून जाते, तसाच प्राण हा शरीराला सहज सोडून जातो. चला आपण त्याचे समाचारास जाऊं. (जिजाई प्रवेश करिते.) जिजाई-कशाला जायचे आहे समाचाराला ? कालचे अंगावरचे वळ बुजाले का ? मेलं हाड म्हटलं तर कुत्रे सुद्धां फिरून घरीं येत नाही. आतां आलेत मेल्याचे हातपाय उरावर. काल काठ्या