पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. प्रवेश ३ रा. C FUJY स्थळ-इंद्रायणी नदीचा डोह. (तुकाराम अभंगाच्या वह्या व कर्जरोख्यांचे दफतर घेऊन प्रवेश करितो.) तुकाराम-गरीब बिचारे शेतकरी ! त्यांच्या जमिनी, घरेदारें, गुरेढोरे गहाण लिहून घेऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसून व्याजाचें व्याज करून आझी सावकार लोक आपलीं पोटें जाळतो. एखादी निराश्रित गाय जशी चिखलात रुतून बसते, त्याप्रमाणे हे शेतकरी रिणानें गांजलेले असतात. पाऊस किती उत्तम पडो, पीक किती उत्तम येवो, सावकाराला एका पैशाचे दहा पैसे पोहोंचले किंवा एका मणाचे दहा मण दाणे पोहोंचले तरी त्याची कुळा. कडची बाकी ह्मणून चुकती होतच नाही. तो त्याच्या घरावर जप्ती नेऊन त्याची गाडगीं मडकी बाहेर काढील तेव्हां त्याला चैन पडेल. सर्पाच्या जातींत जसें फुरसें दुष्ट तसे सावकारांत मारवाडी दृष्ट आह्मांला एक शेंडी तर या बेट्यांना तीन. आमच्या एका शेंडीला तेव्हांच गांठ देतात. हे कर्जरोखे आणि ही गहाणखतें, या कबलायती, आणखी या भाडेचिठ्या ही आमच्या बाबाची मिळकत आह्मी या नदीच्या डोहांत गहाण ठेवणार. बिचान्या शेतकऱ्यांना या जाचांतून मुक्त करणार. (खताचा रुमाल डोहांत फेंकन देतो).आमचे कनिष्ठ बंधू कान्होबा यांना ही गोष्ट पसंत नाही. मानां निम्मी खते वाटून दिली. आमचा कर्जदार पांडरंग. त्याने आपले पाय माझ्याजवळ गहाण ठेवून माझ्याजवळून भक्तीरूप ऋण घेतले आहे. प्रेम हेच व्याज. देवा आमचा हिशोब लवकर करा. रोज कीर्तन करून देवाने घेतलेलें माझें कर्ज मी वाढवीत आहे. तुझें नाम हेच खत आहे. याला साक्षीदार श्रीगुरु आहेत. एक कलम आटपले. आतां या अभंगाच्या वह्या-यांना खाली वर चांगल्या दगडी चिपा घातल्या पाहिजेत, ह्मणजे पुनः वर येणार