पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३रा. • भडकाविली नाही. नुसते दगड आहांत ! त्याला जसे किती मारलें तरी तो बोलत नाही, तसे तुम्ही आहां. एखादा असता तर या गोसावड्याची ही अशी दोढी उपटून (दाढी उपटावयास धांवते. ) हातांत देता. आपलाच दाम खोटा आणखी परक्याशी झगडा करून काय उपयोग ? ( तुकारामाच्या अंगावरून हात फिरवून मंबाजीला उद्देशून) तूं कोडगा, तुझा बाप कोडगा, कोणालारे मेल्या कोडगा म्हणतोस ? ( मंबाजीची शेंडी धरून त्याला गरगर फिरविते. तुकाराम मंबाजीची सुटका करतो. मंबाजी पळून जातो. ) हात् तुझें कपाळ फुटलें मेल्या पळपुट्या ! मेल्याच्या हाताचे कोळसे झाले. तुमचे हात का कोणी बांधले होते का ? तुम्हाला नव्हते का उलट मारतां येत ? सगळ्या अंगावर वळ उठले आहेत. चला घरी हळदबोळ घालतें. तुकाराम-साधुसंतांना अशा शिव्या देऊ नयेत. त्यांची शेंडी अशी उपटू नये. मारले तर मारले. काय हरकत आहे ? माझ्या मनाला क्रोध येतो की काय याची देवानें परीक्षा पाहिली. आज क्रोधाच्या हातून अजिंक्यपत्र मिळविलें. केवढी आनंदाची गोष्ट आहे ! अशा आनंदांत मी असतां तूं त्याची शेंडी उपटून त्याचा हिरमोड केलास हे फार वाईट केलेंस. शरीर काय आहे ? क्लेशाचा मळा, आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक ह्या तापत्रय अग्नीची शेगडी, मृत्युरूप कावळ्याला टाकलेला कागबळी, दुर्गंधीचे कोठार, रोगाचे भांडार, विटाळाचे भांडवल, विषयवासना तृप्त करण्याचे यंत्र, ह्मणजे नरकप्राप्तीचाच रस्ता, प. हाड, मांस, जंत यांचा केवळ उकरडा, असले हे शरीर याचा पुनः संबंध होऊ नये ह्मणुन तर कामक्रोधाचा त्याग करून देवाचें ध्यान करावयाचे. या शरीरावर माझें प्रेम नाही. या शरीराला कोणीही शिक्षा केली तरी मला वाईट वाटणार नाही. जिजाई-पुरे झाली तुमची बडबड. घरीं चला ह्मणजे हळदबोळ घालतें अंगावर. ( तुकारामाला हाती धरून घरी नेते.)