पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. एना आ C FT + तुकाराम-बुवासाहेब, तुमचा माझा बाप कांही निराळा नाही. तुमची आई तीच माझी आई. तुमचा बाप तोच माझा बाप. मंबाजी-गाढवाच्या लेका, संसार घालविलास फुका, तूं कुणबट, मी पवित्र ब्राह्मण. तुझा माझा बाप एक काय ? बापाचें नांव काढलेंस तर आतां नरडीचा घोट घेईन. तुकाराम-देवा ! पुत्राचा उत्कर्ष ऐकिला म्हणजे ज्याप्रमाणे मातेला आनंद वाटतो, त्याप्रमाणे माझें मन आनंदांत राहो. हरिण जसा नादलुब्ध होऊन देह विसरून जातो, तसा तुझ्या ध्यानाने मला या शरीराचा विसर पडो. या समयीं मला कोधाच्या हातून सोडवून घे. माझी वृत्ति शांत असूदे. हे कामकोध पाण्याशिवाय बुडवितात, आगीशिवाय जाळतात, शस्त्राशिवाय मारतात, आणि चिखलाशिवाय गाडून टाकतात. ज्याप्रमाणे चंदनाचे मुळीला सर्पाचे वेष्टण असते, किंवा गर्भाला गर्भवेष्टण असते, तसें ज्ञान ह्यांनी रोधलेले आहे. ह्यांनां जर अंतःकरणात थारा दिला नाही तर यांनां आपण अगदी ठारच केलें ह्मणावया- हे षडिप जर जिंकले, तर ब्रम्हीचे स्वराज्यच प्राप्त झालें म्हणून समजा. गुरु-शिष्यांची गुप्त गोष्ट हीच असते. जीवबह्माचें ऐक्य तें हेंच. मंबाजी-(हात चोळून) मारता मारतां थकलों. फुग्याच्या वाडीच्या भामट्याचा अभ्यास किती दिवस केला होतात ? इतक्या काठ्या मारल्या पण हूं किं चूं नाहीं ! माझ्या मात्र हाताची आग हावयाला लागली. निर्लज्ज, बेशरम, कोडग्यासारखा हांसतो ! तुला लाज नाही वाटत ? | म (जिजाई प्रवेश करते.) जिजाई-आग लागो त्या ब्रम्हज्ञानाला. त्याचे एकदाचें वाटोळे कसे होईना ? लोक मला ह्मणतात, त्याला वेडा वेडा कां म्हणत असतेस ? आतां वेड लागायला कांहीं बाकी का राहिली? इतका मरे मरे तो मार खाल्लांत पण एक श्रीमुखांत कांहीं उलही।