पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. नेय देखोनि साकारे छोरें । जोहो नालाहनीmon अरुण आंगाजवळिके । ह्मणोनि सूर्याते देखे ॥ मा भूतळींची न देखे । मुंगी काई ॥ ८॥ श्रीज्ञानेश्वर. या न्यायाने अशा गहन विषयाचे आकलन करण्याचा शक्तयनुसार प्रयत्न केलेला आहे. ज्याच्या चरित्रांत आजपावेतों या पृथ्वीच्या पाठीवर जितके महान् बुद्धिवान्, पंडित, वक्ते, तत्त्वज्ञानी ह्मणून होऊन गेले त्यांच्या तर्कशक्तीस पुरून अनंत उरलेला जो विश्वव्यापक परमेश्वर, याच्याचविषयी अति विस्तृत विचार भरलेले आहेत, अशा विचारांचे मजसारख्या अल्पमतीकडून यथार्थ विवरण होणे परमाशक्य आहे. असो. प्रस्तुत नाटकांतील शिवाजी या पात्रासंबंधाने विशेष खुलासा करावयाचा आहे तो असाः " रामदासास तर शिवाजीने आपले गुरू करून त्यांस सगळे राज्य वाहिले होते, व हे सुचण्यास आपल्या पदरी भगवा झेंडा बाळगला होता, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. पण तुकारामाचा आणि त्याचा घडलेला प्रसंग सर्वांस माहीत नसेल. तो हा की, तुकारामाची योग्यता ऐकून शिवाजीने त्यास आपल्या भेटीस आणण्याकरितां कारकून, घोडे, अबदागिरी वगैरे मोठा लवाजमा पाठवून दिला. पण तुकारामानें तो तसाच माघारी लावून दिला. पुढे शिवाजी स्वतः होऊन भेटण्यास आला, आणि पुष्कळ जवाहीर नजराणा ह्मणून त्याने तुकारामाच्या पुढे ठेवले. पण तितक्या रत्नांच्या प्रकाशानेही त्या जन्मविरक्त योग्याचे चित्त विरघळलें नाही. त्याने त्यांचा उलटा अत्यंत तिरस्कार दाखविला." निबंधमाला. “शिवाजीस तुकारामाची कथा ऐकण्याची अतोनात गोडी असल्यामुळे त्याने केलेले बेत त्यास पुष्कळ वेळां तहकूब ठेवावे लागत; व एके प्रसंगी तर तुकारामबावांच्या कीर्तनांत आसक्त होऊन राहिला असतां शत्रूची एक टोळी त्यावर छापा घालण्यास आली. पण ते त्यास अगदी आयत्या वेळेस कळून येऊन तो तेथून युक्तीने निसटून गेला." पर ग्रांट डफ्. "एके प्रसंगी बोवांचा ब्रह्मज्ञानाच्या व संसाराच्या मिथ्यत्वावि. षयींचा उपदेश शिवाजीच्या हृदयांत इतका ठसला की, त्याने राज्य सोडून देऊन तो अगदी विरक्त झाला; तेव्हां त्याची आई जिजाबाई