पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. लावला ? हा येथे तुझा बाप जीवंत उभा असतां, चोरा, तं कांट्यांला हात लावणार कोण ? (तुकारामाचे मणगट धरून त्यास पुढे ओढतो.) तुझें साधुपणाचे बंड मोडून टाकतों, तुझी चांगली कणीक मऊ करतो. त्या कांट्या बाजूला केल्यास त्याच्या योगाने माझा भोपळीचा वेल दुखवला त्याची वाट काय ? परवां तुझी झैस रात्रीं मोकळी सुटली, माझ्या बागेत शिरली, साऱ्या झाडांचा नाश केला. तूं आपल्याला मोठा संत ह्मणवितोस नाही का? तुकाराम-कलियुगांत घरोघर संत झाले आहेत. या वीतभर पोटासाठी दारोदार हिंडतात. दुसऱ्याच्या सुंदर सुंदर बायका पाहिल्या ह्मणजे त्यांचे चित्त चंचळ होते, माळा घालतात, मुद्रा लावतात , चंदनाचे टिळे लावतात, सकलादीच्या टोप्या घालतात, आणखी आपल्याच तोंडाने आपल्याला साधु म्हणवितात. बाकी दयाधर्माच्या नांवानें भोपळ्याएवढे. ते नांवाचेच साधु ह्मणावयाचे. देवाच्या प्रदक्षिणेच्या वाटेवरच्या कांट्या बाजूला केल्याने मला वाटते, मी कांहीं कोणाचा अपराध केला नाही. देवाचें काम करावयाला मी कोणाच्या बापाला भिणार नाही. तुमच्याने काय करणे असेल ते करून घ्या. मंबाजी-आणखी तोंड करून चबर चबर बोलतोस. मुसकाड रंगवीन ते ठाऊक नाही वाटते? काय ह्मणे, मला कोणाच्या बापाची भीति नाही. बाप काढतोस काय हरामखोरा, बाप काढतोस बाप काढतोस, बाप बाप बाप-( काठीने तुकारामास मारितो.) तुकाराम-नुसत्या काठीनेच कां मारतां बुवासाहेब ? शस्त्र घेतलेत तर तुमच्या जिवाला इतके आयास पडणार नाहीत. शस्त्राने तुकारामाचा हा देह जरी शतखंड झाला, तरी पांडुरंगाच्या कामाला मी मागें सरणार नाही. तुमच्या मारण्याने मला काय होणार ! कृतांत कोपला तर माझा एक रोम सुद्धा वांकडा होणार नाही. मंबाजी-बाप काढतोस, बाप काढतोस-बाप-बाप-बाप ( आण-खी काठीने मारतो.)