पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

BF REFEBECrvy m .. श्रीतुकाराम. । सुंदराजी-तुह्मी बोलल्यावर मी बोलले. तुमच्या अपराधाबद्दल तुह्मीं माझ्या पायां पडून माझी क्षमा मागितली पाहिजे. नाहीं तर मी अशीच पाटलाच्या घराचा रस्ता धरिते. (जाऊं लागते.) मंबाजी-(तिच्या मागे जाऊन तिचा हात धरून आणतो.) चुकलों. पाया पडतो. माफी मागतो. पण गांवांत माझ्या नांवाचा डंका पिटूं नकोस. (तिचे पायां पडतो.) सुंदराजी-आतां ठीक झाले. आता माझ्या मनाजोगें झालें. आम्ही हलकट की ढोंगी बुवा हलकट याचा निकाल झाला. (जाण्याचे निमित्त करून लपून बसते.) मंबाजी-कांहीं चिंता नाही. याचा सूड घेतल्याशिवाय रहाणार नाही. आज गांवांत कशी झाली तरी मला अब्रू आहे. लोक मला बुवा म्हणून समजतात. रामेश्वरभट सुद्धां मला मान देतात. अशांच्या मनांतून मी उतरून जाऊन माझें वजन कमी होईल ह्मणून मला या हलकट रांडेच्या-- संदराजी-( पुढे येऊन ) फिरून हलकट ! हलकट कोण ? मंबाजी-हलकट मी. तूं नाहींसं. मी हलकट ठरलोंच आहे. ( टाळमृदंगाचा आवाज ऐकलासा करून सुंदराजी जाते.) टाळमटंगाचा आवाज ऐकू येत आहे. ही तुकारामाची दिंडी विठोबाच्या देवळाकडे जाण्याला येत आहे. आता या वेळी काही तरी करापत काढून तुकारामाशी भांडण करून त्याला खूप ठोकायचा, मग जे होणे असेल तें होवो. ही गोष्ट माझ्या मनांत फार दिवसांपामन घोळते आहे. (तुकाराम एक दोन माणसांसह प्रवेश करतो.) तुकाराम-( मंबाजीच्या पायां पडून ) मंबाजीबोवा, दिंडीचे लोक इकडून जातांना त्यांच्या पायांत या तुमच्या बागांतल्या कांट्यांचे कांटे मोडतील म्हणून या देवळाच्या प्रदक्षिणेच्या वाटेवरच्या बाभळीच्या कांट्या उचलून जरा बाजूला ठेवतो. (कांट्या उचलून बाजूला ठेवतो.) मंबाजी-( त्वेषाने ) ये भिकारड्या, कुणाच्या कांद्याला हात