पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मंबाजी-(एकीकडे ) हिला जरा चवदावें रत्न दाखविलें पाहिजे. त्याशिवाय ही ताळ्यावर येणार नाही. (उघड) येऊं का मुसकाड रंगवायला ? सुंदराजी-आणि मी उलट रंगवलें ह्मणजे मग ! तुमच्या माझ्या लढाईत मी हटले तर काही मोठेसें नवल नाही. बोलून चालून मी बायकोच. पण तुह्माला जर का मी हटविलें आणखी तुमची चांगली कणीक मऊ केली, तर सगळ्या गांवांत तुमची फटफजिती उडेल. मंबाजी-(एकीकडे ) आतां आपणच आटपते घेतले पाहिजे. शेराला बांसलें तर तो आपल्यालाच उतणार. हे पहा सुंदराजी, तं चांगली शहाणीसुरती बायको असून अशी मूल्त शिरतेस ? सुंदराजी-मी गांवच्या पाटलाला जाऊन सांगणार की, मंबाजीने मला मारले. मजवर जुलूम केला. माझी अब्रू घेतली. कां तर मी तुकारामाचें सत्त्व हरण केले नाही ह्मणून. मंबाजी-(आर्जवाने ) हे पहा ह्यांत दोघांनाही कमीपणा अमुन यांत दोघांचीही अब खराब होणार आहे. याचा तूं विचार केलास काय ? सुंदराजी-मला कशाची अब्रू नी गैर-अब्रू ? मी कधीच अबूचें गांठोडे करून झाडाला टांगले आहे. पण तुमचे पागोटें दहांत खाली केल्याशिवाय रहात नाही. तुकारामाच्या बायकोने मारल्याचे मला काहीच वाटत नाही. तिचे करणे न्यायाचे होते. आह्मी वेश्या झालों तरी पापपुण्य कशाला म्हणतात हे आह्याला चांगले समजते. समजलांत मंबाजीबुवा ? तुमचे आचरण आमच्यापेक्षां गैरचालीचे असून तुह्मी आम्हालाच ज्या अर्थी हलकट ह्मणतां त्या अर्थी ही पंचाईत पंचापुढे पाटलाच्या मार्फतीने गेलीच पाहिजे. । मंबाजी-(गरीबीने ) असें काय बरे करितेस ? रागाच्या भरात जें झालें तें झालें. तूंही दोन शब्द मला बोललीस, मीही तुला बोललों.