पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

EF BF श्रीतुकाराम. णवी नाक कापून मला अपशकुन करावयाला परत आलीस? जीव द्यावयाचा होतास ! सुंदराजी-पण गुरुजी, इतके रागावतां काय ह्मणून ? - मंबाजी-मी मुळीच तुला गुरु शोभत नाही. काम करण्यांत कच्ची असली शिष्यीण काय कामाची. आज जर तूं तुकारामाचे सत्व हरण केले असतेस, तर या मंबाजीचे आनंदाला पारावार नसता. तुझी अगदी पट्ट शिष्यांत गणना केली असती. पण तूं माझ्या सर्व मनोराज्याचा भंग केलास. मला तुझें तोंड पहावेसे वाटत नाही. चालती हो येथन. संदराजी-मलाही पण तुमचे तोंड पहावेसे वाटत नाही. जशी मी आपल्या जातीला काळिमा आणली, तशीच किंबहुना हजारपटीने जास्त तुम्हीं साधु या पवित्र नांवाला आपल्या आचरणाने काळीकुट्ट काळिमा आणलीत. तुम्ही अझून विषयांत गटकाळ्या खात आहांत. नरकांतल्या किड्यांना ज्याप्रमाणे नरकाची किळस येत नाही, त्याप्रमाणे तुम्हांला विषयाचा तिटकारा येत नाही. तुकाराम विषयसुखाला वांतीप्रमाणे समजतो आहे त्याच्या एका फाटक्या खेटराचा सुद्धा तुमच्यासारख्या भोंदला बरोबरी करता येणार नाही. तुकारामाला कसाला लावन पादिला. तो तर निष्कलंक आहे. तुम्हाला कसोटीला लावल्याबरोनर तमच्या सत्त्वाचे खोबरे झाले. (मोठ्याने मा . तमच्या ढोगाची आता देवंडी पिटवितें. मी आहे समजलांत! मंबाजी-जास्त बोललीस तर जीभ कापून टाकीन. दीड टमडीची तुझी किंमत. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याला लोक अगदी बेवकूब असतील वाटते ? सुंदराजी-सणकाडीची किंमत कांहींच नाही. परंतु ती मोठ्या हवेलीला आग लावू शकते. आपल्या साधुपणाच्या भ्रमाचा भोयळा मी फोडल्याशिवाय रहात नाही, समजलांत ?