पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. अंक ३ रा. घरी येण्याचे कारण काय ? बरें, आलीस ती आलीस, आणखी मी याची लग्नाची बायको धडधडीत उरावर जीवंत असतां “माझें लोढणे गळ्यांत अडकवा," ह्मणून त्याला गळ घालावयाला तुला लाज नाही वाटत ? शंभर मारून एक मोजावा या किमतीचें तूं सांडरू. तुला या जिजाईचा तडाखा ठाऊक नाही वाटते ? (एकीकडे )) उगीच मी आपली मघांपासून तोंडांत बोट घालून लक्ष देऊन ऐकत आडबाजूला उभी आहे; कांहीं तरी मेली लाज ! (तिला केरमाने मारते.) येशील का पुन्हां माझ्या घरी ? पाहिजे का तुकाराम ? पाहिजे का तुकाराम ? सुंदराजी-नको, नको, नको, मला जीवंत जाऊं दे झणजे झाले. तुझ्या पायां पडते. आतां तुझ्या घरी कधी येणार नाही. मला चांगली अद्दल घडली. जिजाई-कां बरें ? कां? कायावाचामनाने तुला माझा नवरा आवडला आहेना ? मग दे त्याच्यासाठी प्राण. माराला कां भितेस? (तुकाराम सोडविण्यास धांवतो. पडदा पडतो.) प्रवेश २ रा. स्थळ -मंबाजीचे घर. (मंबाजीबुवा व सुंदराजी समोरासमोर प्रवेश करितात.) सुंदराजी-मारले हो त्या आकाबाईनें! तुमच्या पायीं मला विनाकारण मार मात्र बसला. .. मंबाजी-तुझे हात का कोंकणांत गेले होते वाटते ? खाऊन खाऊन बोक्यासारखी माजलीस मात्र ! तूंही दोन तडाखे जिजाईला मारावयाचे होतेस. आजपावेतों कसब करावयाचा धंदा करून यःकश्चित् तुकाराम तुझ्याने वळला नाही. तूं आपल्या जा. तीला खाली पाहावयास लावलेंस. माझ्याजवळ लांब जीभ क. रून मोठ्या गप्पा मारून प्रतिज्ञा करून तुकारामाकडे गेलीस, आ