पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. ऐन तारुण्याच्या भरांत आलेले, ज्यांनी देशहिताच्या मर्दुमकीची काम शेंकडों करून आपले नांव अजरामर केले असते, किंवा हरिचरणी लीन होऊन ज्यांनी आपल्या देहाचें सार्थक केलें असते, अशा पुरुषांची तुह्मीं वेश्या थोड्याशा पैशाच्या लालचीनें आणि शरीराला सुख व्हावें ह्मणून राखरांगोळी करतां, तारुण्याला करपून टाकणाऱ्या, वीरश्रीला नष्ट करणाऱ्या, कुलवान आणि तरुणांना भ्रष्ट करणाऱ्या, आयुष्याचा मोड खोडून टाकणान्या, वैराग्याचा भडका उडवून देणाऱ्या, कुलस्त्रियांचा तळतळाट घेणान्या सुंदराजी-हे काय पण बाई, मला काय ह्मणून शिव्या, मी सांगतेंना की, आजपासून सत्याचरणाने चालणार ह्मणून. आजपावेतों झालेलें पाप विसरून जाते. येथून पुढे नवीन करणार नाही. तकाराम-शेणाची बनविलेली चित्रे नारळ वगैरे सोनेरी-रुपेरी मलामा दिलेली जत्रेमध्ये विकावयाला येतात, पण त्यांत कांहीं खोबरें सांपडतें कांहो? नारळ फोडला की आंत शेण. तशी त. मची वृत्ति. वरचा तेवढा टाकमटिकला पाहून घ्यावा. आंतमध्ये शेणसडा. असो. आमाला काय करावयाचे आहे. आम्ही वैष्णव असे नाहीत. तुझांला आम्ही भुलणार नाही. सुंदर स्त्रिया आझाला आस्वलीप्रमाणे दिसतात. शुकाचार्यासारखे वेदपुरुष परस्त्रीला मातोश्रीप्रमाणे समजतात हे खरे, परंतु अप्सरेच्या सौंद र्याने आपण कदाचित् मोहित होऊं ह्मणून डोळे मिटवन घेतात पण हा तुकाराम डोळे उघडे ठेवून तुला असे सांगतो की परस्त्रीला मी रुक्मिणीसमान समजतो. तेव्हां आपली स्वारी आतां परत जावी. आपल्याला माझ्याशिवाय या जगांत थोडे का पुरुष आहेत? आमाला विषयाचा विसर पडून गेलेला आहे. आम्ही कीर्तनाने शुद्ध झालो आहों ? समजलें सुंदराजी ? (तुकारामाची बायको हातांत केरसुणी घेऊन येते. सुंदराजीचे दोन्ही हात आपल्या हातांत धरते व केरसुणीने मारते.) जिजाई-समजले का सुंदराजी उंदराजी इतक्या रात्री तुला माझ्या