पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा... असे जरी आहे तरी त्यांच्याशी झालेल्या लढाईत पुष्कळ विजयश्रीची निशाणे फडकावीतही पण आलेले आहेत. भीष्माचार्य, शुकाचार्य, वज्रदेही हनुमान-एकंदरीत देव तरी आपली कसोटीच पहात असतो. बाई, तुमच्या नवन्याचें नांव काय बरें ? सुंदराजी-(एकीकडे ) हा अगदीच भोळा हो! आम्हांला कोठें नवरा बोलला आहे की काय? आम्ही बोलून चालून वेश्या ! आम्ही रूपाकडे पहात नाहीं, वयाकडे पहात नाहीं, गुणाकडे पहात नाही. जो अधिक पैसा देईल तोच आमचा यजमान, त्याचे मात्र आमच्यावर खरे प्रेम. पण आमचे प्रेम तिसयावरच. आम्ही दाखवू एक आणि करूं एक. ( उघड ) मला बाई सांगायची लाज वाटते. पण खरेच सांगू का? आजपावेतों मी पुष्कळ यजमान केले; परंतु आजपासून मी कायावाचामनाने पहिल्याने आपल्यासच वरिलें आहे. तुकाराम-तूं का वेश्या आहेस का ? सुंदराजी-होय महाराज. तुकाराम-मग तर फारच सोंवळी. सर्व जगांत सोवळी ! अगदी वेशीवरचा आरसा. वाटेल त्याने येतां जातां तोंड पाहा किंवा धर्मशाळेतील उखळ, तुला तुकारामच कशाला हवा ? तुं वेश्या आहेस हे पाहून मला इतका आनंद झाला आहे की बोलायची सोय नाही. प्रथम मला असे वाटले की, कोणा मराठ्या सरदाराची बायको आहे की एखाद्या वेदज्ञ ब्राह्मणाची आहे ! कोणाच्या कपाळी हे असले रत्न पडले आहे कोण जाणे, की नवऱ्याला धाब्यावर बसवून आपण चालली रात्रीचे गुंगारे मारायला. कायहो, पशृंत आणि तुमच्यांत काय भेद ? सुंदराजी-मला नाही भेद समजत.. तकाराम-बरोबर आहे, नाहींच समजणार. कारण आजपावेतों रस्ता पशुंचाच धरलेला आहे. पण मला वाटते तुमच्यापेक्षा पशु बरे. नेमलेला ऋतु आणि आधाशीपणा कमी. ( रागाने)