पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ श्रीतुकाराम. - सुंदराजी-आपण असे निसटून जाऊ नका. स्त्रीहत्येचे पातक भ्रूणहत्येचे पातक आपल्या कपाळी आदळणार आहे. तुम्हाला मी सांगावें असें नाही. तशांतून आपल्या ठिकाणी हे मन इतकें जडले आहे की, रात्रंदिवस आपले ध्यान करण्यांत हे मन आणखी हे शरीर गर्क होऊन गेले आहे. माझ्या मनाप्रमाणे गोष्ट वडून आली नाही तर मी काही जीव ठेवणार नाही. तुकाराम-जीव ठेवणार नाहीं? शाबास. कामाचा तडाखा जबर आहे. ब्रह्मदेवाने आपले डोके गमावले. रावणदुर्योधनांनी आपली राज्ये धुळीस मिळविली. पराशराने दिवसा ढवळ्या अंधकार पाडून धीवरकन्येचा उपभोग घेऊन आपली तपश्चर्या भ्रष्ट केली. इंद्राने सर्व शरीराला भगेंद्रे पाडून घेतली आणि वाळीसुग्रीवाची कुस्ती होऊन तींत रामचंद्राने वाळीला ठार केलें. कामक्रोधाची ही जोडगोळी प्रति रुतांत आहे. ज्ञानाच्या ठेवीवरचे हे भजंग आहेत. भजनमार्गातले जीव घेणारे हे मारेकरी लाभांग आहेत. या देहरूप गडाचे हे फत्तर आहेत, आणि इंद्रियरूप जागांवचा हे भक्कम कोट आहेत. यमाजी भास्कराच्या दरबारांत ब्यांचा मानमरातब मोठा असून ते याचे मोठे प्यारे दोस्त आहेत. या दुष्टांना जर भूक लागली तर ते या विश्वासाचा एकच घास करतील. आपल्या हौसेने जगास नाचविणारे मान आणि अहंकार यांचा मोठा मान ठेवतात, आणि यांच्याशी देवघेव करतात. यांनी सत्याचा कोथळा बाहेर काढून त्यांत गवताचा पेंढा भरला. शांतिरूप पतिव्रतेला यांनी लुटले. मायारूप मांगिणीला शंगारून तिच्याकडून साधुसमुदाय विटाळून सोडला. हे विवेकाला कधी कधीं जमीनदोस्त करतात, आणि वैराग्याची चामडी लोळवितात. उपशमाची मान मोडतात. संतोषरूपी वन तोडून टाकतात. धैर्यरूप किल्ले खणून काढतात. आनंदाचे रोप उपटून टाकतात. उपदेशाला खच्ची करतात. हे शरीराला जडलेले, आणि जीवाला खिळलेले आहेत, पण ब्रह्मादिकांना सुद्धां सांपडत नाहीत. -